अत्याचार esakal
नागपूर

Crime news : लकवा आजारावर उपचार घेणाऱ्या वृद्धेवर अत्याचार

लकव्याचे उपचार घेणाऱ्या वृद्धेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धंतोली परिसराताल एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लकव्याने ग्रस्त असलेल्या ७७ वर्षाच्या वृद्ध महिलेवर एका युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली असून युवकाला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.

दीपक विजय ठाकरे (वय ३९,रा. माटे चौक, गोपालनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दीपक हा वृद्धेच्या मुलाचा मित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी महिलेला लकवा मारल्याने त्यांना धंतोलीतील

लकव्याचे उपचार घेणाऱ्या वृद्धेवर अत्याचार

एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिचा मुलगा तिची काळजी घेत होता. दरम्यान दीपक त्यांच्याकडे आठ ते नऊ वर्षांपासून काम करीत असल्याने त्यांच्या मुलाशी त्याची मैत्री होती. त्यातून तोही रुग्णालयात त्याच्यासोबत होता. यावेळी दीपक बुधवारी (ता.१९) मित्राच्या आईला रुग्णालयात भेटायला गेला होता.

तो येताच औषधी आणण्यासाठी आणि काही कामे आटोपून येतपर्यंत आईची काळजी घेण्यास दीपकला सांगितले. त्यामुळे दीपकने दार लावून घेतले. दरम्यान त्याची आई बेशुद्ध अवस्थेत असताना दीपकने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान हॉस्पिटलमधील परिचारिका वृद्धेला औषध देण्यासाठी आली असता तिला हा प्रकार दिसून आला. त्यांनी आरडा-ओरड केली. अन्य कर्मचारी खोलीत आले. त्यांनी दीपकला पकडून चोप दिला. दरम्यान हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन धंतोली पोलिसांनी दीपकला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT