Crime News esakal
नागपूर

Crime News : पोलिसालाच डांबून गोवंश तस्करांनी ठोकली धूम

गार्ड लाइन ते ऑटोमोटिव्ह चौक चालला थरार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून बोलेरो कारला अडविले. चौकशी केली असता गोवंश निर्दयतेने त्यात कोंबलेले आढळले. पण पाहणासाठी गाडीत चढलेल्या पोलिसाला घेऊन गोवंश तस्करांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली.

अखेर नियंत्रण कक्षाच्या मदतीने तस्करांना ताब्यात घेऊन पोलिसाची सुटका करण्यात आली. हा थरार गार्ड लाइनपासून तर ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत सुरू होता. हिमेश राठोड असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तहसील पोलिस ठाण्याचे पथक मध्यरात्री गार्ड लाईन परिसरात पेट्रोलिंगवर होते. दरम्यान बोलेरो पिकअप व्हॅनवर संशय बळावला. पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनात गोवंश निर्दयपणे डांबून ठेवले होते. कर्तव्यावर असलेले पान २ वर

पोलिसालाच डांबून गोवंश तस्करांनी ठोकली धूम

पोलिस कर्मचारी हिमेश राठोड यांनी वाहन चालक मोहम्मद सलीम (४१) रा. टेका व त्याचा साथीदार राजा मोहम्मद कुरेशी रा. हंसापुरी खदान या दोघांना तहसील पोलिस ठाण्यात घेऊन जात होते.

हॉटेल पॅराडाईज समोर आरोपी चालकाने वाहन थांबविले. राजा आणि त्याच्या साथीदाराने वाहनाचा मागचा पल्ला उघडून गोवंश सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राठोड वाहनाचा गाल्यात बसले आणि पल्ला बंद करीत असताना चालकाने रोठोडसह वाहन पळविले. चालकाला वारंवार थांबविण्याची विनंती केली.

मात्र, त्याने वाहन थांबविले नाही. पोलिस कर्मचारी राठोड यांनी वॉकीटॉकी वरून नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलिसांनी नाकाबंदी राबवून कपिलनगर ठाण्याअंतर्गत ऑटोमोटिव्ह चौकात बोलेरो अडविली. पोलिस कर्मचारी राठोड यांची सुटका करून चालकास ताब्यात घेतले. तसेच नऊ गोवंश आणि बोलेरो वाहन जप्त केले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. चालकाच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT