मारहाण  sakal
नागपूर

Crime news : ‘फादर्स डे’ला पित्याकडून मुलाची हत्या

जगभरात पितृदिन साजरा होत असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मौदा : घरगुती वादातून दारूच्या नशेत पित्याने मुलाचा काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना बोरगाव जुना पथकर नाकाजवळील येथे रविवारी दुपारी घडली. तर गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मुलीने आत्महत्या केल्याचा देखावा केला. आश्विन रतन शेंडे (वय २५) मृताचे असून रतन शेंडे आरोपी पित्याचे नाव आहे. जगभरात पितृदिन साजरा होत असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बोरगाव येथील रतन शेंडे व मुलगा अश्विन रतन शेंडे हे दोघेही वास्तव्यास आहे. दारूच्या नशेत नेहमी दोघांचेही भांडण होत असे. अश्विन हा वडिलांना मारायचा. अश्विन नेहमीप्रमाणे दारू पिण्याकरिता बोरगाव येथे गेला होता. दारू पिऊन अश्विन एका बंद पानठेल्याच्या कडेला झोपला असताना

फादर्स डेला पित्याकडून मुलाची हत्या

संधी साधून रतन तेथे आला. अश्विन झोपेत असल्याचे बघून काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर हा गुन्हा लपविण्यासाठी आत्महत्येचा देखावा करण्याचा प्रयत्न रतनने केला. याकरिता अश्विनच्या गळ्यात नोयलॉन दोरी टाकली.

मात्र रतनने रचलेल्या कट अखेर फसला. बापलेकातील वाद मागील तीन दिवसांपासून सुरू असल्याचे पोलिसांना समजले. हा वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. रतन शेंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मौद्याचे पोलिस निरीक्षक हेमंत खराबे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT