SEX-RACKET e sakal
नागपूर

Crime News : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उझबेकिस्तानसह दिल्लीच्या तरुणींकडून देहव्यापार

हकांकडून चांगली रक्कम उकळून देहव्यापार केला जात होता. ही गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा रोडवर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ने धाड घालून देहव्यापाराचा पर्दाफाश केला. उझबेकिस्तान आणि दिल्लीहून आणलेल्या तीन युवतींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. बंटी ऊर्फ बिलाल अहमद (३७) रा. मानकापूर आणि राजकुमार गडेवार (४०) रा. सदर अशी अटकेतील दलालांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बंटी या व्यवसायात सक्रिय आहे. त्याने मोठे नेटवर्क तयार केले. देश-विदेशातील युवती, महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेतो. त्याने अलीकडेच उझबेकिस्तानहून एका युवतीला व दिल्लीच्या दोन युवतींना नागपुरात आणले.

पाच दिवसांपूर्वीच नागपुरात वर्धा मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. ग्राहकांकडून चांगली रक्कम उकळून देहव्यापार केला जात होता. ही गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांना मिळाली.

त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून एक बनावट ग्राहक पाठविला. त्याने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने धाड घातली. यामुळे हॉटेलमध्ये खळबळ उडाली. पथकाने दलाल बंटी, राजकुमार या दोघांनाही अटक केली. तिन्ही युवतींची सुटका करण्यात आली. सध्या युवती एसएसबीच्या ताब्यात आहेत.

उझबेकिस्तानच्या युवकीकडे पासपोर्ट नसल्याची माहिती पुढे आली आहे. ती आठवडाभऱ्यापूर्वीच भारतात आली. पासपोर्ट नसल्याने ती कोणाच्या मदतीने आणि कितीवेळा आली? याची चौकशी सुरू आहे.

ही कारवाई सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, सहायक पोलिस आयुक्त मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, माधुरी नेरकर, अनिल अंबाडे, समीर शेख, अश्विन मांगे, संदीप चंगोले, सुभाष चौधरी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT