city Nagpur crime news sakal
नागपूर

Crime News Nagpur : चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

सलग दुसऱ्या दिवशी अत्याचाराच्या घटनेने संताप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोराडीत ही घटना घडली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

अटकेतील आरोपींमध्ये गोलू उर्फ हरिओम शिवदयाल सनोडिया (रा. बंडोल, मध्य प्रदेश) याचा समावेश आहे. पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेशातील आहेत. कामाच्या शोधत पीडित मुलीचे आई-वडील नागपुरात आले. कोराडी परिसरात एका इमारतीचे काम करून झोपडीत राहतात. याच परिसरात गोलूही राहतो.

१५ एप्रिलला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गोलू हा मुलीला झोपडीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडत घरी आल्याने मुलीला काय झाले हे तिच्या आई-वडिलाला कळले नाही. तिला अधिकच त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरने तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.

आई-वडिलाने विचारणा केली. तेव्हा गोलूने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. वडिलांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूला अटक केली. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. लकडगंजमध्ये ५७ वर्षीय चौकीदाराने नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT