Crime sakal
नागपूर

Crime news: घरगुती वादातून कुऱ्हाडीचे घाव घालत सुनेकडून सासूची हत्या; नागपूरातील हत्याकांड उघड

हिराबाई सिद्धर्थ पाटील(वय ४५) यांचा त्यांच्या घरीच खून झाला होता

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर : तालुक्यातील झिलबोडी येथे रविवारी(ता.४) झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले असून घरगुती वादातून सुनेने सासूचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रक्षंदा शैलेष पाटील(वय २५) हिला अटक झाली आहे.

हिराबाई सिद्धर्थ पाटील(वय ४५) यांचा त्यांच्या घरीच खून झाला होता. त्यांचे तोंड आणि डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव होते. घटनास्थळावरील माहिती आणि पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. खुनात जवळच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. घटनेच्या दिवशी रक्षंदा आणि हिराबाई ह्या दोघीच होत्या.

सूनच निघाली सासूची मारेकरी

त्यामुळे तपासाची सुई वारंवार सुनेजवळच येऊन थांबत होती. श्वान पथकाला पाचारण केले असता तोही घरातच घुटमळत असल्याने घरातील व्यक्तीनेच घात केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. दोन दिवसांच्या कडक चौकशीनंतर मंगळवारी(ता.६) सायंकाळी पोलिसांनी रक्षंदाला पोलिसांनी अटक केली. घटनेत आणखी कुणी सहभागी आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. आरोपी रक्षंदाला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गिरासे यांनी दिली.

शैलेष-रक्षदांचा प्रेमविवाह होता

हिराबाईचा मुलगा शैलेष(३०) हा शिक्षणाकरिता बाम्हनी(ता. नागभिड) येथे मामाकडे असताना त्याची नागभीड येथीलच रक्षंदासोबत ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण होऊन तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर काही महिने झिलबोडी येथे राहिल्यानंतर दोघेही नागभीड येथे राहायला गेले. गत मार्च महिन्यात पुन्हा झिलबोडीला परतले. शैलेष नोकरीनिमित्त नागपूरला राहात होता. त्यांना १० महिन्याची सना नावाची मुलगी आहे.

उडायचे खटके

शैलेष हा नागपूरवरून कधी कधी झिलबोडीला येत होता. इकडे सासू-सून यांच्यात लहान-सहान गोष्टींवरून खटके उडू लागले. हा घरगुती वाद एवढा विकोपाला गेला की रक्षंदाने कुऱ्हाडीचे घाव घालून सासूला संपविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय पास आता लांबपल्ल्याच्या बसमध्येही चालणार; सोलापूर जिल्ह्यातून हेल्पलाईनवर सर्वाधिक तक्रारी

आजचे राशिभविष्य - 06 डिसेंबर 2025

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला नाश्त्यात 'हेल्दी स्प्रींग रोल' ट्राय केले का? सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ग्रहमान : ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

Pune News : शीतल तेजवानीच्या घरझडतीत महत्त्वाची कागदपत्रे जप्त

SCROLL FOR NEXT