crime  esakal
नागपूर

Crime news : १२ वर्षीय मुलीवर गणित शिक्षकाचा अत्याचार

सक्करदरा येथील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शाळेत शिकविणाऱ्या ३५ वर्षीय गणित शिक्षकाने शाळेतीलच सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर प्रयोगशाळेत अत्याचार केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (ता.१०) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

संजय विठ्ठल पांडे (वय ३५, रा. कामगारनगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा परिसरात असलेल्या एका शाळेत गणित शिक्षक म्हणून संजय पांडे कार्यरत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून तो सातत्याने शाळेत सहाव्या वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करीत होता. त्यामुळे मुलगी सातत्याने घरी आईकडे पोटदुखीची तक्रार करायची. दरम्यान ५ एप्रिलला पांडे याने शेवटला पेपर संपल्यावर मुलीला विज्ञान प्रयोगशाळेत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी आली असता,

आईकडे पोटदुखीची तक्रार केली. यावेळी तिच्या आईने तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता, तिने सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे घटनेचा खुलासा झाला. पालकांनी याविरोधात सक्करदरा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. त्याला न्यायालयाने त्याची १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान शाळा प्रशासनाकडून त्याचा निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे.

लग्न करण्याचे आमिष आणि धमकीही

१२ वर्षीय मुलीवर सातत्याने अत्याचार करीत असताना शिक्षकाने तिला तुझ्यासोबत लग्न करेल असेही आमिष दिले होते. वेळोवेळी तिला प्रयोगशाळेत नेऊन अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकी शिक्षकाने पीडित मुलीला दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT