crime police sakal
नागपूर

Crime News: धक्कादायक! दारू पिण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने जन्मदात्या वडिलांची केली हत्या

सकाळ डिजिटल टीम

ऊळगाव राजा : दारू पिण्याच्या वादावरून एका अल्पवयीन मुलाच्या हातून त्याच्या वडिलांचा खून झाल्याची थरारक घटना तीन दिवसापूर्वी घडली. सदर प्रकरणात जालना पोलिसांकडून कागदपत्रे व मेडिकल सर्टिफिकेट उशिरा मिळाल्याने काल ९ जून रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर खून प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस अंढेरा पोलिसांनी अटक करून बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. याबाबात प्राप्त माहितीनुसार, मृतकाचा भाचा गणेश भिकाजी उचांडे (वय २५) रा. नवीन मंडपगाव यांनी अंढेरा पोलिसात फिर्याद दिली की, त्याचे मामा मृतक राजू लालमन पेंढारकर (वय ४०) व त्यांचा मुलगा आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून जोरदार भांडण झाले.

दरम्यान मुलाने वडील राजू पेंढारकर यांच्या डोक्यावर मूर्ती मारून गंभीर जखमी केले. त्यांना ५ जून रोजी जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.

अंढेरा पोलिसांनी गणेश उचांडे यांची फिर्याद व जालना पोलिसांकडून मिळालेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरून आरोपी मुला विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाच्या आदेशाने आज बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT