crime news update joy of getting job in bank Suspicious death of youth nagpur  sakal
नागपूर

नागपूर : बँकेत नोकरी मिळाल्याचा आनंद दोन दिवसांत हिरावला, तरुणाचा मृत्यू

हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्यंकटेश सिटीच्या बी.विंग येथे टेरेसवरुन पडल्याने युवकाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्यंकटेश सिटीच्या बी.विंग येथे टेरेसवरुन पडल्याने युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.३०) सांयकाळी घडली. शुभम महेंद्र डोये (वय ३०) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अभियांत्रिकी केले असून त्याची एका बॅंकेत नोकरीसाठी निवड झाली होती. यामुळे आई-वडिलांनी पेढेही वाटले होते. शनिवारी सांयकाळी साडेचारच्या सुमारास तो घरी आला. अंडे आणि वडिलांचे औषध आणले. ते खाली न देताच तो टेरेसवर गेला.

तिथे फोनवरुन बोलला. त्यानंतर आईशीही बोलला. मात्र, अचानक काही वेळातच तो खाली पडल्याचे महिलेला आढळले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुचे नागरिक तिथे आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. नागरिकांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शुभमचे वडील हे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्याला एक बहिण असून तिचेही गेल्यावर्षी लग्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांना अकस्मात मृत्युची नोंद केली.

नोकरी न लागल्याने तणावात ?

शुभमची काही दिवसांपूर्वी एका बॅंकेत नोकरी लागली. त्याचे सेलिब्रेशन म्हणून आई-वडिलांनी संपूर्ण विंगमध्ये पेढे वाटले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्याची नोकरी मिळाली नसल्याची माहिती समोर आली. मात्र, घरी हे सांगितल्यास आई-वडिलांचा हिरमोड होईल असा विचार त्याच्या मनात आल्याने तो तणावात असल्याची माहिती आहे. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Sandeep Naik: तिकीट न मिळाल्याने नाराज, पक्ष बदलला; पराभवानंतर संदीप नाईकांचे राजकीय पुनरागमन! राजकारणात खळबळ

Eggs Cause Cancer: अंडी खाल्ल्याने कर्करोग होतो का? FSSAI ने उघड केली वस्तुस्थिती, महत्त्वाची माहिती समोर

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT