Crime ratio of Nagpur is declining very fast 
नागपूर

नागपूर आता क्राईम कॅपिटल राहिले नाही, गुन्ह्यांचे प्रमाण एवढ्या टक्क्यांनी घटले

सकाळवृत्तसेवा

नागपूर : क्राईम कॅपिटल म्हणून उल्लेख केला जात असलेल्या नागपुरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरातील गुन्हे कमी करण्याच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांना आता यश येऊ लागले आहे. खून, जबरी चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यांसह उपराजधानीतील गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल 52 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

काही वर्षांपूर्वी नागपूरचा उल्लेख क्राईम कॅपिटल असा केला जात होता. यामुळे राज्याच्या उपराजधानीची प्रतिमाही मलिन झाली होती. अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यानंतर नागपुरातील गुन्ह्यांच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. शहरात खून होण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मार्च ते मे 2019 या काळात नागपुरात 28 गुन्हे नोंदले होते. यावर्षी 16 गुन्हे नोंदले आहेत. जबरी चोरीच्या गुन्ह्यांतही 28 टक्‍क्‍यांनी प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी जबरी चोरीच्या 43 गुन्ह्यांची नोंद होती. यावर्षी याच काळात केवळ 11 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यांमध्येसुद्धा या काळात घट झाली आहे. गेल्यावर्षी 226 तर यावर्षी 108 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी शहरात चोरीचे 675 तर केवळ 301 गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 374 गुन्ह्यांची कमी नोंद झाली आहे. तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी अत्याचाराच्या 43 आणि यावर्षी 37 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शहरातील अपघाताच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च ते मे या काळात अपघाताच्या 81 गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी याच काळात केवळ 24 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी मार्च ते मे या काळात एकूण गुन्हे 2077 नोंदले होते. गेल्या मार्च ते मे या काळात एकूण गुन्ह्यांची नोंद केवळ 1134 एवढीच आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गृहमंत्र्यांना उपरोक्त आकडेवारी सादर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT