Crime son Former Nagpur Mayor Assistant  
नागपूर

नागपूर : माजी महापौरांसह मुलावर गुन्हा

सहायक पोलिस आयुक्तांच्या अंगावर गेले धावून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धुळवडीच्या दिवशी रामेश्‍वरी चौकात राडा केल्याप्रकरणी माजी महापौर आणि त्यांच्या पुत्रासह पाच जणांवर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटकही केली आहे.

पांडुरंग हिवरकर (वय ६५ रा. रामेश्‍वरी चौक), अजय पांडुरंग हिवरकर (वय ३६), सचिन चंद्रशेखर वाघमारे (वय २२), विपीन कपूरचंद खाटे ( वय ४४), जोगेंदर मेश्राम अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी एक वाजताच्या सुमारास अजय वडील पांडुरंग हिवरकर आणि तीन जण चारचाकी (एमएच/४९/बीके/९९९७ ) वाहनाने जात होते. रामेश्‍वरी चौकात त्यांच्या वाहनाला एक दुचाकी धडकली. यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. यावेळी अजयने कारखाली उतरून दूचाकीस्वारास शिवीगाळ केली. याशिवाय त्याच्या दुचाकीची चावी काढून चारचाकी वाहन रस्त्याच्या मधोमध उभे केले. यावेळी चौकात तैनात असलेल्या पोलिसांनाही त्याने तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलिसांनी त्याला या प्रकरणाची तक्रार ठाण्यात देण्याची सूचना केली. तसेच वाहन बाजूला करीत, रस्ता मोकळा करण्यास सांगितले. मात्र, तसे न करता, त्याने साथीदारासह धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. याशिवाय दुचाकीस्वाराला दवाखान्यातही जाण्यास मनाई केली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त घटनास्थळी आले. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही अजय आणि त्याचे साथीदारांनी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत अजय, विपिन आणि सचिन यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuvraj Singh Sister: कोण आहे युवराजची बहीण? 'या' खेळात करतेय भारताचं प्रतिनिधित्व; जाणून घ्या तिच्याबद्दल

Crime News : मित्रांची मदत अन् १५ दिवसांपासून नियोजन, नंतर भाजप नेत्यानं पत्नीसोबत खेळला रक्तरंजित खेळ, कारण ठरलं...

Mother’s Milk Benefits: जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध का गरजेचं आहे? तज्ज्ञ सांगतात कारणं

Explainer : काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? प्रत्येक तरुणाला मिळणार १५ हजार रुपये, अर्ज कसा कराल? वाचा A टु Z माहिती

Election Commission PC : राहुल गांधींना शपथपत्र देण्यास का सांगण्यात आलं? निवडणूक आयोगाने सांगितलं कारण...

SCROLL FOR NEXT