Female thief sakal
नागपूर

बसमध्ये चोरी करणाऱ्याच निघाल्या महिला

वर्धा मार्गावर बसमध्ये महिलांच्या पर्समधील दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील एका महिलेला साथीदारासह पकडण्यात बेलतरोडी पोलिसांना यश आले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा मार्गावर बसमध्ये महिलांच्या पर्समधील दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील एका महिलेला साथीदारासह पकडण्यात बेलतरोडी पोलिसांना यश आले आहे. टोळीतील ३ महिला फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ललिता भारत बलवीर (५०) रा. कुंजीलालपेठ आणि नितीन पांडुरंग मेश्राम (४८) रा. कुकडे लेआऊट अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बसमध्ये प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधील दागिने व इतर महागड्या वस्तू व रोकड चोरी करणारी ही टोळी अनेक दिवसांपासून शहरात सक्रिय आहे. गत २१ जानेवारीला सायंकाळी ज्योत्सना जीवन लोंडे (वय ५० रा. वणी, यवतमाळ) ही महिला वर्धा मार्गावरील चिंचभवन येथून यवतमाळला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या. प्रवासादरम्यान डोंगरगाव पूर्वीच ४ महिलांनी ज्योत्सनाच्या बॅगमधील ३ तोळ्याचे मंगळसूत्र चोरी केले. ज्योत्सनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आले. मात्र, सर्व महिलांच्या तोंडाला स्कार्फ बांधून असल्याने त्यांची ओळख पटविणे कठिण होते. त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यांना कामावर लावले. त्यातून महिलांच्या टोळी बाबत माहिती मिळाली. पोलिसांनी ललिताला अटक केली, मात्र, इतर तिघी फरार होण्यात यशस्वी झाल्या.

कारने करायच्या ये­-जा

ललिताच्या चौकशीत समोर आले की, नितीन मेश्राम सर्व महिलांना आपल्या कारने ने-आण करीत होता. तो वेगवेगळ्या बस थांब्यावर महिलांना उतरवतो. चोरी केल्यानंतर महिला बसमधून उतरायच्या आणि नितीन त्यांना घेण्यासाठी तेथे पोहोचत होता. चोरीचा माल विकण्याची जबाबदारीही नितीनला देण्यात आली होती. फरार महिलांवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ललिताकडून ७५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

Supreme Court : श्वानप्रेमींसाठी दिलासादायक बातमी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, 'त्या' आदेशावर पुनर्विचार करण्याची...

सात वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या चौघांना अटक....मुख्य आरोपी अद्यापही फरार

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, ३२ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी, कारचा चुराडा

SCROLL FOR NEXT