१७ वर्षीय मुलीवर अत्याचार sakal
नागपूर

नागपूर : गुन्हेगाराचा १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

लग्नाचे दाखविले आमिष; गर्भधारणा झाल्याने घटना उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला गुंडाने प्रेमपाशात अडकविले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. पीडितेला गर्भधारणा झाली आणि घटना उघडकीस आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. विक्रांत शिवाजी गौरकर (२३) रा. प्रेमनगर असे आरोपीचे नाव आहे. विक्रांत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

पीडित मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे. जवळपास सात महिन्यांपूर्वी तिची विक्रांतशी मैत्री झाली. विक्रांतने तिला जाळ्यात अडकविले. दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. ऑगस्ट महिन्यात विक्रांतने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो सतत तिचे शोषण करायचा. दरम्यान पीडितेला गर्भधारणा झाली. पीडितेने कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वी अचानक तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीय तिला घेऊन उपचारार्थ डॉक्टरकडे घेऊन गेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. बदनामीच्या भीतीने कुटुंबीय तिला गर्भपातासाठी बजाजनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. बजाजनगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद केला. मात्र, घटना अजनी हद्दीतील असल्याने प्रकरण अजनी पोलिसांकडे सोपविण्यात आले. आता अजनी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. विक्रांतवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'गौतम गंभीरच्या आधी, मी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलो असतो, पण...'; VVS Laxman च्या दाव्याने खळबळ; नेमकं तेव्हा काय घडलं?

तुकाराम मुंढेंचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे; अभिनेते परेश रावल यांनी फडणवीसांकडे केली 'खास' मागणी, म्हणाले...

Marathi News Live Updates : NEET-UG पेपर लीक प्रकरण : राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाचा निर्णय पुढे ढकलला; आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

SCROLL FOR NEXT