crispy Potato chips now will make solar machines sakal
नागपूर

Potato Chips : बटाट्याचे चिप्स आता सोलर मशीनमधून

केवळ तीन हजारात यंत्र निर्मिती; आकारास अत्यंत लहान

केतन पळसकर

नागपूर : आधुनिक काळातील फराळामध्ये बटाट्याचा चिप्स हा अविभाज्य भाग मानला जातो. उपवास असो, कॉर्पोरेट क्षेत्रातील बैठका असोत किंवा करीच्या दिवशी होणारी पार्टी असो. इतर पदार्थांचा ताटामध्ये समावेश नसला तरी बटाट्याचे चिप्स नक्कीच असतात.

या चिप्सचे निर्मिती मूल्य आणि उत्पादनासाठीची मेहनत आता कमी होणार आहे. कारण, विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थे(व्हिएनआयटी)च्या भौतिकशास्त्र विभागाचे आलोक कुमार, मनु कुमार या विद्यार्थांनी प्रा. डॉ. सुषमा गिरीपुंजे यांच्या मार्गदर्शनात सोलर पॅनलचा आधार घेत चिप्स बनविणाऱ्या यंत्राची निर्मिती केली आहे.

केवळ तीन ते चार हजार रुपयांत हे यंत्र बनविले आहे. तर, दोन बॅटरीचा वापर करण्यात आल्याने सलग चार ते सहा तास हे यंत्र चालते. दुचाकीची बॅटरी सातशे रुपयांत मिळते. त्यामुळे, भविष्यातील देखभाल खर्चसुद्धा आवाक्यात असणार आहे. उद्योगी लोकांना सोईस्कर ठरावे म्हणून यावर अजून संशोधन सुरू आहे. आकारात अत्यंत लहान असल्याने घराच्या कोपऱ्यात चिप्सचा उद्योग सुरू करता येणार आहे.

ग्रामीण भाग आणि प्रामुख्याने ग्रामिण भागातील महिलांना डोळ्यापुढे ठेवत या यंत्राची निर्मिती केली आहे. भविष्यात रोजगाराचे साधन म्हणून या यंत्राकडे पाहिले जावे, म्हणून आम्ही प्रयत्नरत आहोत. यंत्र वापरात येताच पेटंट मिळविण्यासाठी आम्ही अर्ज करणार आहोत.

-डॉ. सुषमा गिरीपुंजे, विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT