nagpur sakal
नागपूर

नागपूर : अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान

गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात(chandrpur districts) गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान(rabbi crops) झाले आहे. अमरावती जिल्ह्यात टाकरखेडा संभू परिसरातील साऊर, कळमगव्हाणा, लसणापूर, रामा, पुसदा, शिराळ्यात गारांसह पाऊस झाला. याचा तूर आणि हरभऱ्याला मोठा फटका बसला आहे.या भागात अर्धा ते पाऊण तास गारांसह पाऊस झाला. नेरपिंगळाई येथे झालेल्या गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.

वर्धा जिल्ह्यात आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळी पावसात बोराएवढ्या गारा पडल्या. आष्टी तालुक्यातील खडकी, टोकोडा, भारसवाडा, परसोडा, वाघोली, शिरसोळी, नरसापूर, किन्हाळा आदी भागात जोरदार पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील पारडी, एकांबा, बोटोणा, सारवाडी, पालोरा, राजणी, बोंदरठाणा या गावात पावसासह गारा पडल्याने नुकसान झाले. पान २ वर पावसासह सोसोट्याचा वारा आल्याने भारसवाडा मागार्वर वृक्ष उन्मळून पडले. पाऊस आण गारपिटीत कापूस भिजला असून संत्रा, गहू, तूर आणि अन्य पिकांचे नुकसान झाले.नागपुरातील गोधनी, झिंगाबाई टाकळी व मानकापूरसह आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस बरसला. ''वेस्टर्न डिस्टर्बन्स''मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT