crowds of passengers and autoriksha owner at Nagpur railway station
crowds of passengers and autoriksha owner at Nagpur railway station 
नागपूर

प्रवाशांशी ऑटोचालकांची धोकादायक झोंबाझोंबी, कसा थोपविणार कोरोना?

योगेश बरवड

नागपूर  ः नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवासी मिळविण्यासाठी ऑटोचालकांची चढाओढ सुरू असते. बऱ्याचवेळा प्रवाशांना गराडा घालून त्यांच्यासोबत अक्षरशः झोंबाझोंबी सुरू असल्याचे दिसून येते. हा धोकादायक प्रकार बघून कोरोना थोपविणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष प्रवासी रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत रेल्वेची ६० टक्के मोबिलीटी पूर्ववत झाली आहे. यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. याउलट शहरात प्रवासी संख्या कमी आहे. यामुळे ऑटोचालकांसाठी रेल्वेस्थानक हेच प्रवासी मिळविण्याचे आशादायी ठिकाण ठरले आहे. एखादी रेल्वे येऊन थांबली आणि प्रवासी बाहेर पडू लागली की, प्रवासी मिळविण्यासाठी ऑटोचालक थेट गेटपर्यंत पोहोचतात. 

ऑटोचालकांच्या गर्दीमुळे प्रवाशांना गेटमधून बाहेर पडणेही शक्य होत नाही. कधी ही चढाओढ अधिकच वाढते. ऑटोचालक जबरदस्ती केल्याप्रमाणे प्रवाशांचे सामान उचलून घेण्याची घाई करतात. कोरोना वाढत असतानाच्या काळात हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. या प्रकाराबाबत प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

चिचभवनचा राहणारा किरण कुहीकर बेंगळुरूच्या आयटी कंपनीत कार्यरत आहे. तो रविवारीच रेल्वेतून स्वगृही परतला. नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांकडून होणारी रेटारेटी बघून आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना मनात निर्माण झाल्याचे त्याने बोलून दाखविले. बेंगळुरूत कोरोनासंदर्भातील नियमावलीचे काटेकोर पालन केले जाते. पण, नागपुरातील असे प्रकार धोकादायक असल्याचे तो म्हणाला.

प्रशासनाने योग्य नियोजन करावे

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रिपेड ऑटोसेवा उपलब्ध आहे. त्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांना स्टॅण्डही देण्यात आला आहे. कोरोनापूर्व काळात मुख्य गेटमधून बाहेर पडणारे प्रवासी आपसूकच या स्टॅण्डवर यायचे. पण, कोरोना काळापासून ‘एक्झीट’साठी मुख्यगेट बंद करून जनरल वेटिंग हॉलकडील गेटचा बाहेर पडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिणामी तिथूनच सर्व प्रवासी बाहेर निघत असल्याने अधिकृत ऑटोचालकांना प्रवासीच मिळत नाही. दुसरीकडे रेल्वेस्थानकाशी संबंध नसणारे ऑटोचालक गेटमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर तुटून पडतात. प्रशासनानेच योग्य नियोजन करवे, अशी मागणी रेल्वेस्थानक प्रिपेड ऑटोचालकांचे नेते अल्ताफ अंसारी यांनी केली आहे. 


संपादन : अतुल मांगे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT