Electricity Bill sakal
नागपूर

Electricity Bill : वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा भार ;अतिरिक्त रक्कम पाहून ग्राहक अवाक

महाराष्ट्रात विजेसाठी सर्वाधिक दर आहे. त्यात महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरवाढ लागू केली. शिवाय आता वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचेही देयक ग्राहकांना दिले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

शितलवाडी : महाराष्ट्रात विजेसाठी सर्वाधिक दर आहे. त्यात महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरवाढ लागू केली. शिवाय आता वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचेही देयक ग्राहकांना दिले जात आहे. महावितरणने एकाच महिन्यात वीज ग्राहकांना दिलेला हा दुहेरी ''शॉक'' आहे.

तालुक्याचे तापमान ४३ अंशांवर गेले आहे. आणखी ऊन्ह तापणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. दिवसा तीव्र उन्ह आणि रात्री उकाड्यापासून बचावासाठी रात्रभर कुलरही सुरू ठेवावा लागत आहे.

यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असून बिलाची रक्कमही वाढली आहे. या बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचेही देयक देण्यात आल्याने ग्राहकांत संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने गतवर्षी द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजूरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ६ ते ८ टक्के अधिकचा भार पडणार आहे.

उन्हाळ्यात अधिक विजेच्या वापरामुळे भरमसाठ बिलासाठी तयार राहावे लागणार आहे. त्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे देयक एप्रिलमध्येच मिळाल्याने ग्राहकांचा पारा चांगलाच चढला आहे. आयोगाची विद्युत पुरवठा संहितेनुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. नवीन नियमांनुसार एप्रिलमध्ये ती दुप्पट करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होईल.

सुरक्षा ठेवीची गरजच काय?

अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे. पण आता राज्यभरात ‘प्रीपेड मीटर’ लावले जाणार आहे. त्यासाठी निविदासुद्धा काढण्यात आली आहे. प्रक्रिया गतीने पुढे जात आहे. हे मीटर लागताच ग्राहकांना पूर्वीच पैसे मोजून नंतर तेवढ्या रकमेची वीज वापरता येणार आहे. अशात अतिरिक्त सुरक्षा ठेवींची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावितरणकडून ‘प्रीपेड मीटर’ लावत असताना अतिरिक्त ठेवींची सक्ती करू नये. तसेच मीटर लागताच जमा झालेली राशीही ग्राहकांना परत करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT