Cyber Crime nagpur Data theft of solar company Case to CBI for investigation  Sakal
नागपूर

Cyber Crime : सोलार कंपनीचा डाटा चोरी

सायबर सेलला तक्रार; तपासासाठी प्रकरण सीबीआयकडे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशातील नामांकित कंपनी असलेल्या ‘सोलार इंडस्ट्रीज’ कंपनीचा महत्त्वपूर्ण डाटा सायबर हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीद्वारे सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) देण्यात आल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथे ‘सोलार इंडस्ट्रीज’ कंपनीचे कार्यालय आहे. याशिवाय बाजारगाव परिसरात त्यांचे उत्पादन तयार करण्याचा कारखाना आहे. कंपनीद्वारे शस्त्र, एक्स्पोसिव्ह यासह विविध क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याचे काम केले जाते. त्यातूनच कंपनीचे देशाच्या संरक्षण विभागाशी अनेक महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी कंपनीच्या रामदासपेठ येथील कार्यालयात सायबर हॅकरद्वारे सोलार कंपनीचा डाटा चोरी त्यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय त्यातून ‘२ टीबी’ डाटा चोरल्याची माहिती दिली. सोबतच त्यांना एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगण्यात आले. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे ती लिंक ओपन न केल्यामुळे हॅकरच्या माध्यमातून ‘प्रोटोन’ मेल पाठविण्यात आला. त्यात ७२ तासात मेलमध्ये दिलेल्या सर्व सूचना मान्य करण्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर सेलकडे २१ जानेवारीला तक्रार नोंदविली. सायबर सेलने त्याबाबत तपास केला असता, हॅकरद्वारे कंपनीचा डाटा चोरल्याचे समोर आले. त्यातून सेलद्वारे आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

सीबीआय करणार तपास

कंपनीकडून डाटा चोरल्याची तक्रार येताच, सायबर सेलने आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. मात्र, प्रकरण संरक्षण खात्याशी निगडीत असल्याने पोलिसांकडून राज्य सरकारला याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यातून हा तपास केंद्रीय गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यातून या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) देण्यात आला आहे. याशिवाय पुढे एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

९० एमबी डाटाची चोरी?

‘सोलार इंडस्ट्रीज’कंपनी’चे संकेतस्थळ हॅक करून त्यातून सायबर हॅकरने जवळपास ९० एमबी डाटा चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कंपनीद्वारे ५० एमबी डाटा चोरण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश डाटा कंपनीद्वारे पुन्हा मिळविण्यात आला असल्याचेही समजते. मात्र, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT