KALINGA
KALINGA
नागपूर

सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर ‘कोविड हॉस्पिटल्स’; रुग्णांच्या जिवाशी खेळ

अनिल कांबळे

नागपूर : सध्या कोरोनामुळे अनेक रुग्णालये (Covid Hospitals) फुल्ल आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) किंवा रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी (Remdesivir) भटकावे लागत आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) उचलत अनेक हॉस्पिटलच्या वेबसाईटवरील फोन नंबर हॅक केले आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाइकांना बेड मिळवून देण्याच्या नावावर सायबर गुन्हेगार लुटत असल्याचे प्रकार राज्यात उघडकीस आले आहेत. (Cyber criminals are active on fake covid hospitals website in nagpur)

रुग्णांचे नातेवाईक गुगलच्या माध्यमातून मोठ्या हॉस्पिटलचा शोध घेतात. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी राज्यातील विविध हॉस्पिटलच्या वेबसाइटवर हल्ला केला आहे. विशेषतः महागड्या हॉस्पिटलचे संकेतस्थळ हॅक करण्यात येते किंवा हॉस्पिटलच्या फोन नंबरऐवजी सायबर गुन्हेगार स्वतःचे फोन नंबर टाकून ठेवतात. इमर्जन्सी असलेल्या रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फोन नंबरवर फोन करतात. तेथे ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटरची चौकशी करतात. हीच वेळ हेरून सायबर क्रिमिनल्स नातेवाइकांना एकच बेड उपलब्ध असल्याचे सांगतात. ॲडव्हान्स रक्कम भरल्यास बुक करू शकतो, असे सांगतात. त्यामुळे अडचणीत असलेले नातेवाईक बेड मिळणार असल्यामुळे लगेच पैसे भरण्याची तयारी दर्शवितात.

असे पसरवतात जाळे

सायबर क्रिमिनल्स रुग्णाच्या नातेवाइकांना बेड देण्याचे आमिष दाखवून ५० हजार ते १ लाख रुपये ॲडव्हान्स भरण्यास सांगतात. नातेवाईकाला गुगल पे किंवा फोन पे वरून पैसे भरण्यास सांगितले जाते. खात्यात पैसे आल्यानंतर त्यांचा फोन लगेच बंद होतो. बरेचदा फोन लावल्यानंतर फसगत झाल्याचे लक्षात येते.

हॉस्पिटल किंवा कोणत्याही प्रतिष्ठानाची गुगलवरून मिळालेली माहिती नीट पारखून घ्या. आपण फोन केल्यावर तो कट होणे आणि अन्य फोन वरून रुपये भरण्यासाठी व रुग्णाची माहिती भरण्यासाठी म्हणून लिंक दिल्यास या धोकादायक व संशयास्पद हालचाली आहेत. वेळीच सावध व्हा. बँकेची- डेबिट/क्रेडिट कार्डचा माहिती लिंक मध्ये भरू नये. ओटीपी शेअर करू नये. शक्यतो प्रत्यक्ष खात्री करून पैसे काउंटरवर भरा आणि लगेच त्याची पावती घ्या. फसवणूक झाल्याचे कळताच त्वरित पोलिसात तक्रार द्या.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

(Cyber criminals are active on fake covid hospitals website in nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT