सायबर सुपारीचे नवे अस्त्र! ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवी शक्कल 
नागपूर

सायबर सुपारीचे नवे अस्त्र! ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवी शक्कल

ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून त्यासंबंधी रेटिंग घेणे किंवा रिव्ह्यू मागणे सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सध्या सर्वत्र ऑनलाइन खरेदीचा ज्वर वाढला आहे. यातच आज ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून त्यासंबंधी रेटिंग घेणे किंवा रिव्ह्यू मागणे सुरू केले. अनेकजण रेटिंग देतात, रिव्ह्यू पण लिहितात. परंतु आता ऑनलाइन विक्री कंपन्यांकडून त्यांचे प्रतिसाद नसलेले उत्पादने विक्रीसाठी किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांचे सर्वाधिक खप होणाऱ्या उत्पादनाची विक्रीत घट करण्यासाठीही फेक रिव्ह्यू व रेटिंगचाही वापर होण्याची शक्यता बळावली आहे. उत्पादन किंवा सेवेबाबत रेटिंग किंवा रिव्ह्यू आता सायबर सुपारीचे नवे अस्त्र ठरण्याची चिन्हे आहेत.

वेगवेगळ्या ऑनलाइन कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवी शक्कल शोधण्यात येत आहे. एखाद्या ग्राहकाने ऑनलाइन उत्पादन खरेदी केल्यानंतर त्याला तत्काळ लिंक पाठवून त्यावर उत्पादनाबाबतचे रेटिंग किंवा रिव्ह्यू मागितला जातो. यात अनेकजण उत्पादन आवडल्यास ओके, गुड असा शेरा मारून रिव्ह्यू देतात तर काही ठिकाणी ३, ४, ५ स्टार असे रेटिंग देत असल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले.

तेच उत्पादन दुसरा एखादा ग्राहक खरेदी करण्यापूर्वी त्या उत्पादनाबाबतचे रिव्ह्यू, रेटिंग बघतो. अनेक ग्राहक अशाप्रकारे ऑनलाइन खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. अर्थातच रेटिंग व रिव्ह्यू चांगला असला तर ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीकडून संबंधित उत्पादनाला मागणी वाढते. ऑनलाइन खरेदीच नव्हे तर हॉटेल, जिम, बॅंकिंग, ट्रॅव्हल्ससारख्या सेवा दिल्यानंतर रेटिंग देण्याचा आग्रह संबंधित प्रतिनिधीकडून धरला जात आहे.

अनेकजण रेटिंग देऊन मोकळे होतात. परंतु याच रेटिंगचा फायदा या कंपन्यांना होतो. नेमके लाभाचे हेच सूत्र धरून आता विविध ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्या तसेच सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी फेक रेटिंग व रिव्यूचा वापर होण्याची शक्यता आहे. किंबहुना एखाद्या कंपनीची विक्री पाडण्यासाठी किंवा स्वतःच्या कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी याचा वापर कंपन्यांकडून होण्याची शक्यता पारसे यांनी व्यक्त केली. यात दोन्ही प्रक्रियेत ग्राहकांचे नुकसानच नव्हे तर फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे.

''सोशल मीडियावर घर बसल्या काम करून पैसे कमवा, पार्ट टाइम पैसे कमवा, असे मेसेज दिसतात. या कामात बरेचदा पेड व फेक कस्टमर रिव्ह्यू, रेटिंग देण्याची जबाबदारी संबंधितांवर असते. हेच फेक रिव्ह्यू व रेटिंग इतर ग्राहकांनाही फारवर्ड केली जाते. याचा एखाद्या उत्पादनासाठी सकारात्मक व नकारात्मक वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून सामान्य नागरिकांचीच फसवणूक होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी रिव्ह्यू व रेटिंगचा आधार घेऊन खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या सद्सद्‍ विवेक बुद्धीचा वापर करावा.''

-अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT