डी. राजा sakal
नागपूर

D Raja : भाजपला पराभूत करा, भारताला वाचवा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवांचे आवाहन

डी. राजा : ‘लोकशाहीत नागरिकांची भूमिका’ व्‍याख्‍यान

सकाळ वृत्तसेवा

भारताला वाचवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीला आगामी निवडणुकीत पराभूत करावे लागेल, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव व माजी खासदार डी. राजा यांनी केले.

कॉम्रेड एच.एल. परवाना मेमोरियल ट्रस्टच्यावतीने भाई वर्धन सभागृह, परवाना भवन येथे ‘लोकशाहीत नागरिकांची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया बँक असोसिएशनचे महासचिव व्यंकट चलन, एच.एल. परवाना मेमोरिय ट्रस्टचे राजकुमार गुप्ता, बीएनजी शर्मा, जयवंत गुरवे, राम नेरकर, राजेश बोभाटे, डी.एच. बुचे उपस्थित होते.

डी. राजा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षीय लोकशाही नाकारली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारची लोकशाही म्हणजे हुकूमशाहीला चालना ठरणारी होती. त्यामुळे आज आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आहे. त्यांनी राज्यघटनेने सर्वांना सर्व क्षेत्रात समान संधी, समानता दिली असली तरी आज फक्त मतदानाचा अधिकार एवढीच समानता आहे.

उद्योगपती गौतम अदानी आणि देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचे एक मूल्य आहे. मात्र, आपण नागरिक आणि गौतम अदानी समान आहोत, असे मात्र म्हणू शकत नाही. एवढी आर्थिक, सामाजिक दरी या देशात निर्माण झाली आहे. असा आरोप त्यांनी केला. संचालन डी.एच. बुचे यांनी केले.

हिंदू राष्ट्रासाठी

डॉ. आंबेडकरांवर दबाव

राज्यघटना लिहिली जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भारताला हिंदू राष्ट्र करण्याबाबत दबाव टाकला जात होता. परंतु, या दबावाला त्यांनी भीक घातली नाही. डॉ. आंबेडकर यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून राज्यघटनेत संबोधण्याची मागणी अमान्य केली होती. तसेच त्यांनी अध्यक्षीय लोकशाही सुद्धा नाकारली. स्वातंत्र्य लढ्यात कवडीचेही योगदान नसलेल्या भाजप व संघाच्या हातात सत्ता असल्याची खंत त्‍यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT