dance bar
dance bar sakal media
नागपूर

डान्सच्या नावावर तरुणींचा ‘विवस्त्र डान्स’; १०० रुपये तिकीट

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामा (Dance Hangama) नावाची जाहिरात करून बंद शामीयानांमध्ये नग्न डान्सचे (Nude Dance) अश्लील प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागपूर जिल्ह्यात सर्जा राजाच्या नावावर ‘रात्रीस खेळ’ चालत आहे. शंभर रुपयांमध्ये डान्स बघण्यासाठी तरुणांनी चांगलीच गर्दी कोली होती. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ गावचा नसल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागांमध्ये शंकरपटाचे आयोजन करण्यात येत आहे. याला तरुण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळतो. दिवसभर शंकरपटची मज्जा घेतल्यानंतर रात्री शामियान्यात ‘न्यूड डान्स’चा (Nude Dance) आनंद तरुण घेत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. बंद शामीयानामध्ये अश्लीलतेचा कळस गाठला जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी गावातील असल्याचे बोलले जात आहे. डान्स हंगामाच्या (Dance Hangama) नावावर अश्लील नृत्य (Nude Dance) सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. हा व्हिडिओ आमच्या गावचा नाही. गावाची बदनामी करण्यासाठी आमच्या गावाचे नाव घेतले जात आहे, असे गावचे सरपंच रितेश आंबोने व नागरिकांनी सांगितले.

शंभर रुपयांची तिकीट

कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये असे डान्स हंगामा (Dance Hangama) आयोजित करण्यात आले आहे. डान्स हंगामाच्या नावावर तरुण, तरुणींचा विवस्त्र डान्स बघायला मिळत आहे. हा डान्स बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. डान्ससाठी शंभर रुपये तिकीट दर आकारला जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ (video viral) आमच्या गावचा नाही. १७ तारखेला गावात शंकरपट झाला. त्यानंतर लावणीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आमच्या गावचा नाही.
- रितेश आंबोने, सरपंच, बाम्हणी
सदर आयोजित कार्यक्रमाच्या तीन आयोजक संयोजकांना ताब्यात घेतले आहे. व्हायरल व्हीडिओमधील प्रकार यांच्याच आयोजित कार्यक्रमात झालाय की नाही याची शहानिशा करणे सुरू आहे.
- यशवंत सोलसे, पोलिस निरीक्षक, उमरेड पोलिस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT