Murder sakal
नागपूर

Daryapur Crime : कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून वाद; तिघांच्या हत्येप्रकरणी दोघे गजाआड

कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेला वाद गेला विकोपास.

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर - कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपास गेल्याने वाहनाने चिरडून तिघांची हत्या केली, तर तिघे गंभीर जखमी आहे. त्याप्रकरणी खल्लार पोलिसांनी बुधवारी (ता. २०) दोघांना अटक केली.

श्यामराव अंभोरे (वय ७०), अनसूया अंभोरे (वय ६७) आणि अनारकली गुजर (वय ५५), अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे असल्याचे खल्लार पोलिसांनी सांगितले. तर हल्ल्यात किशोर अंभोरे, उमेश अंभोरे व शारदा अंभोरे हे जखमी आहेत. संशयित चंदन गुजर व राधेश्याम गुजर, या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथे चंदन राधेश्याम गुजर याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होता. अनेक वर्षांपासून संशयिताची गावात दादागिरी वाढली होती. काही दिवसांपूर्वी त्या घरावर पोलिसांची धाड पडली. ही माहिती अंभोरे कुटुंबीयांनी दिल्याचा संशय वाढल्याने त्याचा राग आला होता, त्यात अंभोरे यांच्या कुत्र्याने कोंबडी पकडल्याची ठिणगी पडली.

मंगळवारी रात्री अंभोरे कुटुंबीय शेकोटीजवळ बसले असताना चंदन गुजर याने त्यांना मारहाण केली. यात किशोर अंभोरे यानेही प्रत्युत्तर देत चंदनला मारहाण केली, हाच राग धरत चंदन गुजरने त्याचे चारचाकी वाहन काढले आणि थेट अंभोरे कुटुंबीयांच्या अंगावर घातले. त्यात तिघे ठार, तर तिघे गंभीर जखमी झालेत.

मध्यस्थी काकूच्या जीवावर बेतली

चंदनची काकू अनारकली मोहन गुजर (वय ५५) या भांडण सोडविण्यासाठी गेल्या, मात्र झटापटीत त्यांनाही संशयित आरोपीने वाहनाने चिरडले.

चंदन गुजरवर विविध गुन्हे

संशयित चंदन गुजर याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून आजवर कधीच तडीपारीची कारवाई झाली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.

तिहेरी हत्याप्रकरणात दोघांना अटक झाली असून, त्यात अन्य लोकही सहभागी आहेत का, ही बाब तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयितांचा अवैध दारू विक्रीचा अहवाल मागणार आहे.

- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT