devendra Fadanvis devendra Fadanvis
नागपूर

‘ते सरकार पाडून दाखवा म्हणतात ना’ सध्या त्यात इंटरेस्ट नाही

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा... असे ते दरवेळी म्हणतात ना... ते पडेलही, ज्यावेळी पडेल, तेव्हा माहितीही पडणार नाही. परंतु, सध्या आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्‍नांमध्ये इंटरेस्ट आहे. ते म्हणतात सरकार पाडून दाखवा, अन् आम्ही त्यांना म्हणतोय की, काम करून दाखवा, जनतेचे प्रश्‍न सोडवून दाखवा, त्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

शुक्रवारी दसरा महोत्सवानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोरदार भाषण झाले. त्यांनी मोठ्या खुबीने महाविकासआघाडीतील सहकारी दोन पक्षांचे नावे घेणे टाळले, दुसरीकडे भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.

बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे. परंतु, काल आम्ही तेथे केवळ गरळ ओकताना मुख्यमंत्र्यांना बघितले. शिवसेनेचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर उभा आहे. अर्धेअधिक उमेदवार आम्ही त्यांना दिले आणि सरकार मिळाले तर ते नीट चालवून दाखवा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

ड्रग्जचा विळखा हळूहळू घट्ट होतोय

ड्रग्जच्या विरोधात मोठी लढाई लढली जात आहे. याचा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांना आनंद व्हायला पाहीजे. परंतु, तसे होताना दिसत नाही. मुंबईमध्ये ड्रग्जचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. अशात युवा पिढीला या विळख्यातून सोडवायचे असेल, तर ड्रग्जच्या विरुद्ध लढाई लढावीच लागेल. परंतु, राज्य सरकार या लढाईमध्ये सहभागी आहे किंवा होईल, असे सध्यातरी वाटत नाही. कारण, हे सरकार ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांच्या बाजूने आहे की, ड्रग्ज घेणाऱ्यांच्या बाजूने, की ड्रग्जविरोधात लढणाऱ्यांच्या बाजूने आहे, हेच कळत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT