Crime esakal
नागपूर

Nagpur Crime : सूनच निघाली सासऱ्याच्या हत्येची ‘मास्टरमाइंड’; ३०० कोटींच्या संपत्तीसाठी दिली सुपारी

३०० कोटींच्या संपत्तीसाठी खुद्द सुनेने सासऱ्याची सुपारी दिल्याचा खुलासा गुन्हेशाखेच्या पोलिसांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्राणांतिक अपघात घातपातच असल्याची माहिती समोर आली असून, ३०० कोटींच्या संपत्तीसाठी खुद्द सुनेने सासऱ्याची सुपारी दिल्याचा खुलासा गुन्हेशाखेच्या पोलिसांनी केला. याप्रकरणी सुनेला पथकाने अजनी परिसरातून अटक केली. काल (ता. ५) कारचालकासह दोघांना अटक केली. सुपारी घेणारा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अर्चना पुट्टेवार असे सुनेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आणि पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२ रा. बालाजीनगर) यांची मुलगी योगिता प्रवीण पार्लेवार (वय ५०) यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे योगिताचे लग्न अर्चनाचा भाऊ प्रवीण यांच्याशी झाले. मात्र प्रवीण हयात नसल्याने योगिता पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यासोबत राहते. मुलगा डॉ. मनीष (वय ५४, रा. शुभनगर, मानेवाडा रोड) हे ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून, ते कान, नाक, घसा तज्ज्ञ आहेत. त्यांचे घरीच शुभम क्लिनिक आहे.

२२ मे रोजी बालाजीनगरमधील दिनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाताना अज्ञात कारने त्यांना चिरडले. अपघातानंतर चालक कारसह पसार झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका नातेवाईकांना असल्याने त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्रार केली. सिंगल यांनी गुन्हेशाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी नीरज निमजे (वय ३२) व सचिन धार्मिक (वय ३०) यांना अटक केली.

नीरज आणि सचिन यांनी सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून खून केल्याचे सांगितले. सार्थक फरार असून, तो मनीष यांचा चालक असल्याचे समोर आल्याने पोलिसांना हा प्रकार सुपारी किलिंगचाच असल्याची शंका आली. कसून विचारणा केल्यावर त्यांनी या घातपातासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना यांनीच सुपारी दिल्याची माहिती समोर आली. अर्चना यांना बालाजीनगरातील घरून अटक केली.

प्रकरण न्यायालयात नेल्याची सल

अर्चना आणि योगिता यांच्या ३०० कोटींच्या संपत्तीतून वाद होता. या प्रकरणात योगिता आणि पुरुषोत्तम यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे प्रॉपर्टीचा वाद चव्हाट्यावर आला होता. यामुळे अर्चना यांच्या मनात योगिता आणि पुरुषोत्तम यांच्याविषयी राग होता. त्यातून अर्चना यांनी सार्थकला हाताशी धरून पुरुषोत्तम आणि त्यानंतर योगिताचा काटा काढण्याचे ठरविले होते.

असा झाला तपास

बालाजीनगरमध्ये पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडल्यानंतर फरार असलेल्या सचिनला गुन्हेशाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली. त्याने घाट रोड परिसरातून कार खरेदी केल्याचे आढळून आले. बालाजीगरात अपघात केल्यावर त्याने छिंदवाडा मार्गावरही अपघात केल्याचे समोर आले. पोलिसांनी सचिन व त्याच्या माहितीवरून नीरजला अटक केली. सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून खून केल्याचे दोघांनी सांगितले. त्यानंतर सुपारी देणाऱ्या अर्चना यांचे नाव आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक, चांदी मात्र उतरली; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

राज्यपालांकडे ४ वर्षांपासून विधेयक मंजुरीसाठी पडून, हे खोटं कसं म्हणता? सरन्यायाधीशांचा केंद्र सरकारला सवाल

Stock Market Opening: शेअर बाजारात खरेदी; निफ्टी 25,000च्या जवळ, कोणते शेअर्स वाढले?

महेश मांजरेकरांची लेक मराठी सिनेमात येणार? सई मांजरेकरला करायचंय मराठी चित्रपटात काम

Shocking News : भूतबाधा की मानसिक आजार? जन्मदात्या आईनं 15 दिवसांच्या बाळाला ठेवलं फ्रीजमध्ये; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण!

SCROLL FOR NEXT