dead bodies of father and son were found in rotten state nagpur crime police Sakal
नागपूर

Nagpur Crime News : घरात आढळले बाप-लेकाचे मृतदेह

साधारणतः दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने मृतदेह कुजलेले होते. याबाबत कळमना पोलिसांना माहिती दिल्यावर गोकुळ महाजन यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : कळमना येथील गुलशननगरातील माँ गंगा सोसायटीमध्ये राहणाऱ्या बाप-लेकाचे मृतदेह शनिवारी (ता.१) सकाळी नऊ वाजताच्या कुजल्या अवस्थेत आढळले. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शिवदास पांडुरंगजी भेंडे (वय ७०) असे वडील तर हरीश शिवराज्य भेंडे (वय ३९) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास भेंडे हे महानगरपालिकेतून निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असून हरीश काम करीत नव्हता.

शनिवारी सकाळी घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी माहिती शिवदास यांचा मोठा मुलगा रोशन (वय ४४, रा. सत्यमनगर,कापसी खुर्द, बिडगाव रोड) याला दिली. मजुरीचे काम करणाऱ्या रोशन याने तकाफडकी घरी येऊन दार ठोठावले.

मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने दार तोडून आत प्रवेश केल्यावर सोफ्यावर हरीश तर आत बाथरुममध्ये शिवदास पडलेले आढळले. साधारणतः दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने मृतदेह कुजलेले होते. याबाबत कळमना पोलिसांना माहिती दिल्यावर गोकुळ महाजन यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला.

त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविले. मोठा मुलगा रोशन परिवारासह कापसी खुर्द परिसरात राहत असून हरीश वडिलांसह गुलशननगरात राहतो. हरीश कुठलेही काम करीत नसून वडिलांच्या पेन्शनवर त्याचा उदरनिर्वाह चालत होता.

ना भांडण ना तंटा

हरीश वडिलांसोबत राहात असताना, त्याचे कुणाशाही भांडण वा वाद नव्हता. पोलिसांनी परिसरात आणि मुलाला विचारणा केल्यावर त्याला दुजोरा देण्यात आला. दरम्यान नेमका कशा कारणाने दोघांचा मृत्यू झाला याचे कारण गुलदस्त्यात असून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कळेल असे पोलिसांनी सांगितले.

आधी हरीशचा मृत्यू ?

गुलशननगरातील घटनेनंतर डॉक्टरांनी मृतदेहाच्या केलेल्या तपासणीत एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील शिवदास यांच्यापूर्वी हरीशचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी सांगितल्याचे कळते. विशेष म्हणजे, हरीशच्या हातावर जखम असून वडिलांच्या हातावर एकही जखम नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखीनच वाढल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT