dead person found in Maharashtra express at Nagpur  
नागपूर

रेल्वेच्या बोगीत बेशुद्धावस्थेत सापडला युवक; डॉक्टरांना पाचारण करताच समोर आली धक्कादायक माहिती  

योगेश बरवड

नागपूर ः महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये बुधवारी दुपारी सुमारे ४५ वर्षेवयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. बुधवारीच नागपूर रेल्वेस्थानकावरील कार पार्किंग परिसरात वृद्ध महिलेचाही मृतदेह आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

०१०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल होताच. या गाडीच्या रियर बोगीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडून होता. कोणतीही हालचाल करीत नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. 

लागलीच रेल्वेच्या डॉक्टर ज्योत्सना यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासताच मृत घोषित केले. माहिती मिळताच लोकमार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह मेयो रुग्णालयाकडे रवाना केला. मृताची ओळख पटू शकली नाही.

याच प्रमाणे बुधवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये ६० ते ६५ वर्षे वयोगटातील अनोळखी महिला निपचित पडून असल्याचे भारवाहकांना दिसले. त्यांनी लागलीच उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला माहिती दिली. तिथून लोहमार्ग पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस हवालदार फुसाटे व सहकाऱ्यांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयाकडे रवाना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT