Why are detergents dangerous for animals and nature: घरोघरी दररोज वापरले जाणारे डिटर्जंट पावडर जलचर प्राण्यांच्या जिवावर उठले आहे. एका विज्ञान शिक्षकाने केलेल्या प्रयोगातून ही बाब स्पष्ट झाली आहे. डिटर्जंटमधील घातक रसायनांचे प्रमाण मोजणारे उपकरण या शिक्षकाने तयार केले असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे.
साईनाथ मारोतराव चंदापुरे, असे या प्रयोगशील शिक्षकाचे नाव असून ते गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर (उमरखेड) या शाळेत कार्यरत आहेत. ‘द इफेक्ट ऑफ डिटर्जंट टाईड ऑन फ्रेश वॉटर‘ या त्यांच्या संशोधनाची फिशरी सर्वे ऑफ इंडियाने दखल घेत त्यांना नॅशनल टीचर सायंटिस्ट ऑफ इंडियाचे कायमस्वरूपी सदस्यत्व दिले.
डिटर्जंटमध्ये रसायन किती प्रमाणात मिसळले आहे हे शोधणारे (एआय बेस्ड डिटर्जंट क्वालिटी चेक डिवाईस) उपकरण साईनाथ चंदापुरे यांनी साकारले आहे. कपडे धुतल्यानंतर घराघरांमधून बाहेर पडणारे डिटर्जंट पाण्याच्या विविध स्त्रोतांमध्ये मिसळते. या उपकरणाच्या आधारे चंदापुरे यांनी डिटर्जंटचा नद्यांमधील अपृष्ठवंशीय प्राण्यांवर होणारा परिणाम तपासला.
या अभ्यासात असे निदर्शनास आले की, पाण्यातील डिटर्जंटची पातळी एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर ५० टक्के अपृष्ठवंशीय प्राणी (जसे की खेकडा) मृत्युमुखी पडले. त्यावरून रासायनिक डिटर्जंटची पातळी वाढत गेली तर अपृष्ठवंशीय प्राणी नष्ट होतील. शिवाय, त्यावर अवलंबून असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या परिसंस्थेलाही हे घातक ठरू शकते, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला. या संशोधनाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे. आता चंदापुरे यांनी हे संशोधन भारत सरकारकडे ‘पेटंट’साठी दाखल केले आहे.
या उपकरणात डिटर्जंट टाकल्यानंतर ते प्राण्यांसाठी किती प्रमाणात घातक आहे, याचा सहजतेने अंदाज येतो. यावर ऑरगॅनिक डिटर्जंट हा उपाय मी माझ्या संशोधनात नोंदविला आहे. माझ्या शाळेतील सर्वांचे मला या संशोधनात सहकार्य मिळाले.
- साईनाथ चंदापुरे, प्रयोगशील शिक्षक, उमरखेड (यवतमाळ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.