crime sakal
नागपूर

नागपूर : ढकलल्याने मोठ्या बहिणीचा मृत्यू; लहान बहिणीवर गुन्हा

मालकी हक्काच्या वादातून दोन बहिणीत झालेल्या झटापटीत मोठ्या बहिणीला फरशीवर ढकलले

अनिल कांबळे

नागपूर : घरावरील मालकी हक्काच्या वादातून दोन बहिणीत झालेल्या झटापटीत मोठ्या बहिणीला फरशीवर ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा अजनी पोलिसांनी दाखल केला. जयशीला सुरेंद्र गणवीर (५०, रा. जोशीवाडी, कुकडे ले आऊट) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लहान बहिणीचे नाव आहे.जोशीवाडी येथे थॉमस नावाचे दाम्पत्य राहत होते. त्यांना मुलेबाळे नव्हती. त्यामुळे जयशीला ही त्यांची काळजीवाहक म्हणून त्यांच्याकडे कामाला होती. (dispute between two sisters over a home ownership)

काही दिवसांपूर्वी थॉमस यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीची ती काळजी घेत होती. दरम्यान, जयशीलाची परिचारिका असलेली मोठी बहीण धर्मशीला बाळचंद डहाट (५४) ही आपल्या कुटुंबियांसह थॉमस यांच्या घरी वरच्या मजल्यावर राहायला आली.त्यानंतर थॉमस यांच्या पत्नीचे देखील निधन झाले. त्यानंतर जयशीलाने घरावर मालकी सांगून धर्मशीला हिला घर रिकामे करण्यास सांगितले होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास दोघ्याही बहिणीमध्ये वाद झाला असता त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत जयशीलाने धर्मशीलाला फरशीवर ढकलले. त्यात धर्मशीलाच्या डोक्याला फरशीचा मार लागून घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. याप्रक़रणी अजनी पोलिसांनी जयशीलावर ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT