Tiger Cubs Sakal
नागपूर

Tiger Cubs Death : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील दोन नवजात शावकांचा मृत्यू

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘ली’ वाघिणीच्या दोन नवजात शावकांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘ली’ वाघिणीच्या दोन नवजात शावकांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली.

नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘ली’ वाघिणीच्या दोन नवजात शावकांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. यातील एक शावक तिचाच दात लागल्याने जखमी होऊन मरण पावले दुसरे मृत जन्माला आले. या वाघिणीने याआधीही पाच नवजात पिलांना स्वत:च ठार केले आहे.

‘ली’ वाघिणीला आज सकाळी प्रसव वेदना सुरू झाल्या. यापूर्वी प्रसवानंतर लगेच शावकांना तोंडात दाबून मारण्याचा वाघिणीचा इतिहास लक्षात घेता पिलांना तातडीने वेगळे करून कृत्रिम संगोपनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ८.२५ च्या सुमारास ‘ली’ ने पहिल्या पिलाला जन्म दिला. सदर पिल्लू अर्धे बाहेर आले असताना वाघिणीने त्याला तोंडाने बाहेर ओढून काढले. यावेळी पिलाच्या मानेजवळ दाताने जखम झाल्याने त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर अनेक तास वाघिणीच्या प्रसव वेदना थांबल्या होत्या.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तिला पुन्हा प्रसववेदना सुरू झाल्या. यावेळी तिने दुसऱ्या पिलास जन्म दिला. यावेळी ‘ली’ला तातडीने पिलापासून वेगळे करून त्याला पशुवैद्यकीय पथकाने ताब्यात घेतले. पण सदर पिल्लू मृत जन्माला आल्याचे लक्षात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे, अभिरक्षक दीपक सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सारिका खोत, सहा. वनसंरक्षक माडभूशी उपस्थित होते. अत्यावश्यक परिस्थिती हाताळाण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठाचे प्रमुख आणि वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरिष उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले होते. मृत शावकांचे सायंकाळी वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये शव विच्छेदन होऊन सायंकाळी उशिरा अग्नी देऊन शव नष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT