नागपूर

ग्रामीण भागात मृत्युसंख्येत प्रचंड वाढ; आरोग्य विभागाकडे मात्र चाचण्यांचीच नोंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येसोबत ( मृत्युसंख्येतही वाढ झाली आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ कोरोना चाचणी केलेल्यांची नोंद होते. मृत्यूची माहिती नाही. आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर साधा प्रतिसादही देत नाही. त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. डॉ. सेलोकरांना हटवून त्यांचा पर्याय शोधा, असा सूर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी काढला. (death rate of corona patients is more in Rural areas)

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाइन बैठक आज अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाचा कारभार अध्यक्षांकडे असल्याने विरोधी सदस्यांसह सत्तापक्षाच्या सदस्यांचा पाराही चढलेला होता.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतला देण्याचा निर्णय घेतला. शिवाय मागील वर्षी कोरोनाकाळात आशा वर्कर यांनी चांगले काम केले. मात्र, आता त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांना २ हजार वाढीव मानधन देत विमा योजनेचा कालावधी वाढवावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश बर्वे यांनी आरोग्य विभागाला दिले.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहो. जिल्हाधिकाऱ्यांकडे १०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा प्रस्ताव पाठविला असून ५७ कोटींची मागणी केली आहे.
-रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ठेवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात संसाधनांचा अभाव आहे. निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
-आतिश उमरे, भाजप, स्थायी समिती सदस्य

(death rate of corona patients is more in Rural areas)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT