Deepali Chavan suicide case Shivkumar struggles for bail amravatu news 
नागपूर

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण : शिवकुमारची जामिनासाठी धडपड

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आयएफएस अधिकारी विनोद शिवकुमार यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी (ता. १५) अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता, असे उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी सांगितले.

गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक असलेले विनोद शिवकुमार हे काही दिवस धारणी पोलिसांच्या कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहामध्ये केली. याप्रकरणाचा तपास एसडीपीओ पूनम पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी आतापर्यंत वनकर्मचारी, अधिकाऱ्यांसह आवश्‍यक अशा पंचवीस ते तीस जणांचे बयाण नोंदविले आहे. त्यात दीपाली यांच्या आईसह दीपाली यांच्या पतीचाही समावेश आहे.

याप्रकरणामध्ये तत्कालीन मेळघाट व्याघप्रकल्प संचालक व क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांचे याप्रकरणात शासनाने निलंबन केले. परंतु, अद्याप त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रेड्डीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी रेटली होती. याप्रकरणात दीपाली यांचा मोबाईल, संगणक, त्यांनी केलेला पत्रव्यवहाराचा काही भाग, शिवाय त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली तीन पत्रे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली.

चौकशी वनविभागाशी संबंधित
दीपाली यांच्या आत्महत्येस कोण दोषी आहेत? याप्रकरणाची प्राथमिक चौकशी महिला आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविली आहे. त्यांची चौकशी वनविभागाशी संबंधित आहे. पोलिसांचा घटनेशी संबंधित तपास सुरू आहे.
- डॉ. हरिबालाजी एन.,
पोलिस अधीक्षक, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT