Indigenization of defence equipment Sakal
नागपूर

Defence Indigenization: संरक्षण क्षेत्रातील उपकरणांचे होणार स्वदेशीकरण, डिफेन्स कॉन्क्लेव्हमध्ये अमीत सतीजा यांची माहिती

Indigenization of defence equipment; सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण विषयक उपक्रमांच्या चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Indigenization of Defense Equipment: आपण सातत्याने मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हे शब्द ऐकतो. त्यादृष्टीने सरकार व प्रशासन कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादनात स्वदेशीकरण होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण विषयक उपक्रमांच्या चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या याद्यांमध्ये ४ हजार ६६६ वस्तू निश्चित करण्यात आल्या असून आता त्या आपल्या देशातच तयार केल्या जाणार आहेत, अशी माहिती संरक्षण उत्पादन संचालक अमित सतीजा यांनी दिली.
संरक्षण मंत्रालय, संरक्षण उत्पादन विभाग, फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिफेन्स-एमएसएई कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते.

अंबाझरी (वाडी) येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन ॲकेडमी येथे आयोजित या परिषदेत ते बोलत होते. यावेळी एअर व्हाइस मार्शल प्रकाश द्विवेदी, यंत्र इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव पुरी, फिक्कीचे सदस्य अनिल कुलकर्णी, संदीप मेटलक्राफ्ट प्रा. लिमिटेडचे उपाध्यक्ष सागर अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते. (Latest Marathi News)


सतीजा म्हणाले, एकूणच संरक्षण उत्पादनांचे स्वदेशीकरण वाढले आहे. त्यामुळे, उत्पादनासाठी वर्षाकाठी ४० ते ५० परवाने देण्यात येत आहेत. बऱ्याच राज्यांनी शंभरहून अधिक परवाने प्राप्त केले आहेत. ही आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कुलकर्णी यांनी, तर सूत्रसंचालन संजीव पुनिया यांनी केले. आभार सागर अग्रवाल यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT