delta plus esakal
नागपूर

कोरोनाबाधितांचे संस्थात्मक विलगीकरण; डेल्टामुळे महापालिका सावध

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात डेल्टा प्लसचे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने उपाययोजनांवर भर दिला आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश काढून कोरोनाबाधितांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक केले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावे लागेल अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

शहरात आतापर्यंत पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिकेने उपाययोजनांवर भर दिला. यापुढे शहरात आढळून आलेल्या बाधितांना आता घरी नव्हे तर संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागणार आहे. झोनमधील पॉझिटिव्ह रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात वा रुग्णालयात दाखल झाला की नाही याबाबत बारकाईने लक्ष ठेवा, असे आदेश आयुक्तांनी सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले.

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका वाढला आहे. बाधित रुग्ण ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण असू शकतो. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही बाधित आढळून आल्यास स्वतःच खबरदारी घ्यायची आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता बाधिताला गृह विलगीकरणात राहता येणार नाही.

मनपाचे विलगीकरण केंद्र

मनपाचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आमदार निवास येथे आहे. पॉझिटिव्ह रुग्ण मनपाच्या गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिकागृह किंवा मेडिकल कॉलेज, मेयोमध्येही उपचारासाठी भरती होऊ शकतात. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खासगी रुग्णालयामध्येही दाखल होऊ शकतात.

शहरात डेल्टा प्लसचा धोका आहे. कोरोनाचा रुग्णही डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. यापुढे कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. याबाबत झोनच्या सहायक आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहे.
- राधाकृष्णन बी., आयुक्त, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT