No ventilators available in Government medical hospital in Nagpur  
नागपूर

७० विद्यार्थ्यांना डेंगीसदृश्‍य आजार; २५ विद्यार्थ्यांना निदान

केवल जीवनतारे

नागपूर : चार महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मेडिकलचे विद्यार्थी त्रस्त झाले होते. आता डेंगी आजाराच्या तापाने मेडिकलचे विद्यार्थी बेजार झाले आहेत. दोन महिन्यांत ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डेंगीसदृश्य आजार झाल्याचे निदान झाले असून, यातील २५ जणांना डेगी झाल्याचे निदान झाले आहे.

मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपासून तर निवासी डॉक्टरांना डेंगीसदृश्‍य आजाराचा दंश झाला. सध्या एका डेंगीग्रस्त निवासी डॉक्टरवर मेडिकलच्या वॉर्डात उपचार सुरू आहेत. मेडिकलचे निवासी डॉक्टर व आंतरवासिता डॉक्टरांनाही डेंगीसदृश्‍य आजाराने ग्रासले आहे. मेडिकलमध्ये दोन महिन्यात मेडिकलला सुमारे ३० निवासी डॉक्टर तर २० एमबीबीएसचे विद्याार्थी आणि २५ च्या जवळपास आंतरवासिता डॉक्टरांना ताप आला होता.

यातील अंदाजे २५ जणांना डेंगी असल्याचे निदानही झाले. सध्या एक निवासी डॉक्टर मेडिकलच्या पेइंग वार्डात उपचार घेत आहे. काही विद्यार्थी त्यांच्या घरी वा वसतिगृहात उपचार घेत असून बरेच जण आजारातून बाहेरही आले आहेत. मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत आहे. त्याची प्रत्येक वर्षी गवत कापण्यात येते. कीटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु, यंदा कोरोनामुळे दुर्लक्ष झाले. विलंबाने कीटकनाशक फवारणी झाल्याने येथे डास वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT