file 
नागपूर

काय म्हणावे या नशिबाला ! अडचणीच्या काळात वीस हजार "निराधारां'चे अनुदानही लॉकडाउन...

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : राज्यशासनाच्या वतीने निराधार, वृद्धापकाळ, अपंगत्व, विधवा व दुर्धर आजाराने ग्रासलेल्या लाभार्थ्यांना उपजीविकेकरीता हजार रुपये देण्यात येतात. मात्र, मागील चार महिन्यांपासून शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे सुमारे वीस हजार लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.

लाभार्थ्यांसाठी अडचणींचा काळ
तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील विविध योजनांचे जवळपास वीस हजार लाभार्थी असून यांना शासनाकडून महिन्याकाठी मिळणारी उपजीविकेकरिता मिळणारी मदत राज्य शासनाकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर तालुका पातळीवरून लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र, नवीन वर्ष लागल्यापासून कुणालाही अनुदान मिळू शकले नाही. याबाबत हे निराधार लाभार्थी बॅंकेत जाऊन बॅंक कर्मचाऱ्यांना विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे.

निधीची कमतरता
येथील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार उके यांच्याशी विचारणा केली असता सांगितले की जानेवारीपासून राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्याच्या खात्यात जमा होऊ शकले नसून आता हे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. मात्र, हे अनुदान आम्हाला तीन प्रकारे प्राप्त होत असून शासनाकडून आलेला निधी कमी असल्यामुळे काहींना जूनपर्यंत काहींना मे, तर काहींना एप्रिल महिन्यापर्यंत पुढील एक दोन आठवड्यात वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून निराधार लाभार्थ्यांकरिता पाठविण्यात येणारा हा निधी तीन विभागांत विभागला जातो. त्यात अनुसूचित जाती, जनजाती व इतर घटकांचा समावेश असतो.

अनुदान खात्यात लवकरच जमा होईल !
संजय गांधी निराधार योजनेच्या अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जूनपर्यंत तर इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याचे तहसील कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच श्रावणबाळ योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना मे तर जमातीच्या लाभार्थ्यांना जून व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यापर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

लॉकडाउनमुळे कशी जाऊ?
माझे बॅंक ऑफ महाराष्ट्र महादुला शाखेत खाते आहे. घरच्या आर्थिक अडचणीमुळे लॉकडाउनच्या पूर्वीपासून बॅंकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले. बॅंक कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन विचारपूस करायला सांगितले. परंतु, लॉकडाउन कसे काय जाणार.
जिजाबाई शालिकराम सोनेकर
(वय 70) लाभार्थी
महादुला, नगरपंचायत परिसर


औषध घेता आले नाही.
शासनाकडून महिन्याकाठी मिळणाऱ्या पैशातून मी आपल्या औषधोपचाराचा खर्च भागवीत असते. परंतु, मागील चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे मला औषध घेता आले नाही.
कुसुम महादेव कांबळे
(वय 65)लाभार्थी
रामगड परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT