Desperate father jumps into lake over daughter medical expenses  Sakal
नागपूर

Nagpur News : मुलीच्या उपचारावरील खर्चाने हताश पित्याची तलावात उडी

तीन वर्षांच्या मुलीचा आजारामुळे वाढत असलेला खर्च आणि त्यातून निर्माण झालेला कर्जाचा डोंगर अस्वस्थ करीत होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तीन वर्षांच्या मुलीचा आजारामुळे वाढत असलेला खर्च आणि त्यातून निर्माण झालेला कर्जाचा डोंगर अस्वस्थ करीत होता. त्यामुळे हताश झालेल्या औषध विक्रेत्याने अंबाझरी तलावात उडी घेत आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला.

मात्र वेळीच दोन पोलिसांनी धाडसी करीत तलावात उडी घेऊन इतर नागरिकांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवला. जीवनदान देणाऱ्या या दोन पोलिसांचे विभागाकडून कौतुक होत आहे. अविनाश कोसारे (३७) असे अंबाझरी तलावात उडी घेणाऱ्याचे नाव आहे.

अविनाश मानेवाडा भागातील अमरनगर येथे पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह राहतात. एकुलती एक मुलगी जन्मापासूनच आजारी आहे. तिच्या उपचारावर बराच खर्च झाला. त्यांनी कर्ज घेऊन उपचार केले. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. परंतु, मुलगी आजारमुक्त झाली नाही.

कर्जाच्या ओझ्याने अविनाश सतत तणावात होते. मनात नकारात्मक विचार सुरू झाले. आता जगून उपयोग तरी काय, असा विचार करून ते रविवारी घरून निघाले. रविवारी औषधांचे दुकान बंद असते. काम आहे असे पत्नीला सांगून ते दुपारच्या सुमारास घराबाहेर पडले.

यानंतर त्यांनी तलावात उडी घेतली पण पोलिसांनीअविनाश यांना बाहेर काढल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी अविनाश यांची आस्थेने विचारपूस केली आणि समुपदेशन केले. अविनाश यांची पत्नीही ठाण्यात पोहोचली. या घटनेने पती-पत्नीचे डोळे पाणावले. पोलिसांच्या धाडसाचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त राहुल मदने आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी कौतुक केले.

अंबाझरी तलावाच्या काठावर बराच वेळ मारल्या चकरा

अविनाश दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास अंबाझरी तलाव परिसरात गेले. त्यांनी बराच वेळ विचार करून परिसराच्या चकराही मारल्या. जीवन संपविण्याच्या विचारावर ठाम झाल्यावर त्यांनी तलावात उडी घेतली.

याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता अंबाझरी पोलिस ठाण्यातील बिट मार्शल प्रशांत गायधने आणि यशवंत धावडे पोहोचले. त्यांनी व परिसरातील लोकांनी तलावात उडी घेतली. अविनाशला पाण्याबाहेर काढले. काही वेळानंतर ते शुद्धीवर आले. त्यांना पोलिस ठाण्यात आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT