संग्रहित छायाचित्र 
नागपूर

गुड न्यूज, लॉकडाउन असतानाही शिक्षकांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउन असल्याने शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नाममात्र आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. त्यात पेन्शनचाही समावेश आहे. पेन्शन लवकर मिळत नसल्याने प्रत्येक पेन्शनधारक हवालदील झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही पेन्शनची आतुरतेने वाट पाहात आहे. मात्र, त्यांच्यासाठी गुड न्यूज असून, कर्मचारी कमी असले तरी पेन्शनची कामे तत्काळ करा, असा आदेशच शिक्षण उपसंचालकांनी काढल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.


शिक्षणाधिकरी कार्यालयात 10 टक्केच कर्मचारी कर्तव्यावर असल्याने सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याच्या तक्रारी भाजप शिक्षक आघाडी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे भाजप शिक्षक आघाडीचे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.

सेवानिवृत्तीनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फक्त पेंशनचा आधार असतो. पेंशनचे सर्व आर्थिक लाभ तत्काळ कर्मचाऱ्यांना मिळावे, अशाप्रकारचे बरेच शासन निर्णय व परिपत्रक आहेत. मात्र, त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. लॉकडाउन असल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात 10 टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पेंशन प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रस्ताव, भविष्य निर्वाह निधी, अंतिम परतावा, पेंशन उपदान, पेंशन विक्री व वैद्यकीय प्रतिपूर्ती अशा प्रकारच्या प्रकरणांना विलंब होत आहे.

ही प्रकारणे लॉकडाउनच्या काळात तत्काळ व प्रथम प्राधान्याने निकाली काढण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीचे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीशी संबंधित सर्व प्रकरणे लॉकडाउनच्या काळात तत्काळ व प्रथम प्राधान्याने निकाली काढण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे आता पेंशन प्रकरणे तत्काळ निकाली निघणार असल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT