नागपूर

Devendra Fadnavis: 'श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे बिनकामाचे'! देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता डागलं टीकास्त्र

रामलल्ला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे... ही घोषणा आता खरी ठरली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanavis on Ram Mandir: रामलल्ला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे... ही घोषणा आता खरी ठरली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान होत आहेत. या आनंदाच्या क्षणी अयोध्येला न जाण्याचा निर्णय काहींनी घेतला. रामाचे अस्तित्व नाकारणारे हे लोक बिनकामाचे आहेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता टीकास्त्र सोडले.

हिंदू रक्षा समितीतर्फे महाल येथील पंडित बच्छराज व्यास चौकात रविवारी आयोजित श्रीराम उत्सव सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेले देवेंद्र फडणवीस यांचा गदा देऊन सत्कार केला. संत साहित्याचे अभ्यासक श्रीराम जोशी यांनाही सन्मानित करण्यात आले. संजय शिरपूरकर, सुनील काबरा उपस्थित होते.

कारसेवकांच्या आठवणींना फडणवीस यांनी यावेळी उजळा दिला. ‘६ डिसेंबर १९९२ रोजी सकाळी सर्व कारसेवक एकत्र जमले. ढाचा खाली येणार, असा निर्धार करूनच सर्व एकवटले होते. ढाचा खाली आला आणि मंदिरही तयार झाले. ‘रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे...’ अशी घोषणा देण्यात येत होती, ती आता खरी करून दाखविली. आता अयोध्येत भव्य मंदिर तयार झाले आहे. २२ जानेवारीनंतर सर्वांनी अयोध्येला जाऊन दर्शन घ्यायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. (Latest Marathi News)

जागो तो एक बार हिंदू जागो तो.. गायले गाणे

जागो तो एक बार हिंदू जागो तो... या टायटल साँगचे हे गीत फडणवीसांनी पूर्णपणे गायलं. त्यावेळी, उपस्थित तरुणांनी टाळ्या वाजवून फडणवीसांना दाद दिली. तसेच, जागे थे वीर शिवाजी, जागे थे गुरू गोविंद प्यारे, जागी थी झाँसी की राणी, जागे थे भगतसिंह दिवाने, जागे थे गोसारी भाय.. अशी महापुरुषांची नावे घेत, त्यांची महती सांगणारं हे हिंदू गीत गायलं. त्यानंतर, जय श्रीराम म्हणत फडणवीसांनी सर्वांचा उत्साह वाढवल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT