Devendra Fadnavis sakal
नागपूर

Nagpur News : देवेंद्र फडणवीस आणि संघामध्ये ‘गुफ्तगू’

नागपूरमध्ये प्रथमच आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज नागपूरमध्ये प्रथमच आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत नेमके काय ठरले हे गुलदस्त्यात असले तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे यानंतर फडणवीस थेट दिल्लीला रवाना झाले असल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. फक्त नऊ उमेदवार निवडूण आले. त्यातही विदर्भात दोनच खासदार शिल्लक राहिले आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी सत्तेतून मुक्त करण्याची विनंती करीत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाची आता भाजपला गरज राहिली नसल्याचे मत व्यक्त केले होते.

या वक्तव्याने स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. सध्या भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता संघाशिवाय विजय अवघड असल्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झाली असावी. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आणि संघाच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याने संघटनेत मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहे.

नावे गुलदस्त्यात

सध्या नागपूरमध्ये संघाचा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. देशभरातील स्वयंसेवक यात सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध राज्यातून पदाधिकारी आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे संघाचे पदाधिकारी स्थानिक नव्हते. त्यामुळे त्यांची नावे कोणालाच कळू शकली नाही.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती नाही. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरी त्यांची भेट घेतली. फडणवीस आणि संघाचे पदाधिकारी याशिवाय या दरम्यान कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे याचा तपशील कोणालाच कळू शकला नाही. फडणवीस यांनी आधीच माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT