Devendra Fadnavis said why delay the Municipal Subject Committees 
नागपूर

नगरसेवकांमधील असंतोष उफाळू नये म्हणून भाजपने वेळ नेली मारून; आता देवेंद्र फडणवीसांनी विचारला जाब

राजेश चरपे

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर मनीषा धावडे यांनी पदभार स्वीकारून एक महिना झाला असतानाही महापालिकेतील विषय समित्यांच्या नियुक्तीला उशीर का होतो आहे, अशी विचारणा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. दोन दिवसांत समित्या जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

दयाशंकर तिवारी यांनी सात जानेवारीला महापौर म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर २० जानेवारीला त्यांच्या नेतृत्वात महापालिकेची पहिला सभा पार पडली. याच सभेत विषय समित्यांचा विषय होता. यातच नावांची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, नगरसेवकांमधील असंतोष उफाळून येऊ नये यासाठी महापौरांना विषय समित्या निवडण्याचे अधिकार बहाल करून भाजपने वेळ मारून नेली.

दयाशंकर तिवारी यांनी सभा आटोपल्यानंतर दोन दिवसांत विषय समित्या जाहीर केल्या जातील, असे ठामपणे सांगितले होते. मात्र, कोणाला, कुठली समिती द्यायची यावर एकमत होत नव्हते. आपल्या माणसाची वर्णी लागावी यासाठी शहरातील अनेक नेते दबाव टाकत आहेत. मनपा निवडणुकीचे वर्ष असल्याने प्रत्येकाला समितीचे सभापतीपद हवे आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा आहे.

अनेक सिनिअर नगरसेवक चार वर्षांपासून रिकामे

अनेक सिनिअर नगरसेवक चार वर्षांपासून रिकामे आहेत. त्यांना कुठलेच पद दिले नाही तर दुसरीकडे काही विशिष्ट नगरसेवकांना दोन-दोन समित्या तर काहींना सलग दोन ते तीन वर्षांपासून सभापती म्हणून कायम ठेवले आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

स्थानिक नेते गटबाजी करतात

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूरमध्ये होते. काही नगरसेवकांनी भेटून त्यांनी नाराजी दर्शवली. कोण कसा वागतो याच्याही तक्रारी केल्या. याची दखल घेत फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना मनपातील विषय समित्या जाहीर करण्यास विलंब का केला जात आहे अशा विचारणा केली. स्थानिक नेते गटबाजी करतात, ज्येष्ठांना विचारत नसल्याच्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

जी राम जी! विधेयकामुळे राज्यावर आर्थिक भार, आधीच तिजोरीवर ताण त्यात आणखी खर्च वाढणार

Drugs Seized : साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुण्यासह पिंपरी, मुंबई, गोव्यात कारवाई; पाच जणांना अटक

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

Driving License : वाहन परवान्यासाठी आता ‘जागते रहो’; रात्री एक वाजता स्लॉट खुले, संख्या कमी केल्याने अडचण

SCROLL FOR NEXT