तांदूळ  e sakal
नागपूर

तांदूळ घोटाळ्यात बडे मासे अडकणार? फडणवीसांनी केंद्राकडे पाठविले कागदपत्रे

संजय डाफ

नागपूर : रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात (ration rice scam case) अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी नागपूर रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (opposition leader Devendra Fadnavis) यांची भेट घेतलीय. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी या घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्राकडे पाठविल्याचे बोलले जात असून येत्या काळात भाजप तांदूळ घोटाळ्याचा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदूळ घोटाळ्याची मोठी व्याप्ती आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा दिला जातोय. तसेच रेशन दुकांनमध्ये येणारा तांदळाचं वजन कमी असते. मोठ्या प्रमाणात तांदूळ बाहेर विकला जातो. हा प्रकार अधिकारी आणि राईस मिल मालकांचे संगनमताने होतो. त्यामुळे याच रेशनवरील तांदूळ घोटाळ्याबाबत नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे म्हटले होते. त्याचे धागेदोरे वरपर्यंत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता रेशन दुकानदार संघटनेने फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्राकडे पाठविल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाची चौकशी झाल्यास मोठे मासे यात अडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT