D-gang Sakal
नागपूर

D-Gang : ‘डी-गॅंग’शी अनंत जैनचा संबंध?

नागपूरच्या व्यापाऱ्याला ऑनलाइन गेमिंगच्या नावाने ५८ कोटींनी गंडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपूरच्या व्यापाऱ्याला ऑनलाइन गेमिंगच्या नावाने ५८ कोटींनी गंडा घालणाऱ्या गोंदियातील कुख्यात बुकी अनंत जैन उर्फ सोन्टू याचा संबंध दुबईतील ‘डी-गॅंग’शी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढला आहे. त्याच्या टुरिस्ट व्हिसाला मुदतवाढ मिळाल्यावर हे तथ्य बाहेर आले आहे.

अनंत जैन हा झडतीच्या एक दिवसाआधी दुबईला पळाला. सध्या तो दुबई आणि इतर देशात फिरत असल्याची माहिती आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या दाऊद इब्राहिम याचा खास असलेल्या नावेदशी त्याचे संबंध असून त्याच्या मदतीने तो व्यापाऱ्यांची फसवणूक करणे आणि इतर अवैध धंदे करीत असल्याची माहिती आहे.

एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाश्‍यात, अनंत जैन दुबईतील एका आलिशान कार्यालयातून बऱ्याच कर्मचाऱ्यांसह अवैधरित्या ऑनलाइन व्यवसाय चालवत असल्याची माहिती आहे.

त्यात दाऊद इब्राहिम टोळीचा जवळचा सहकारी असलेल्या नावेद त्याची मदत करीत असल्याचे समजते. जैन त्यांच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकीही देत असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यावर अनंत जैन याच्या गोंदियातील घराची झडती घेत, पोलिसांनी १६ कोटी रोख रकमेसह १४ किलो सोने आणि २०० किलोहुन अधिक चांदी जप्त केली. याशिवाय चार लॉकरमधून ८५ लाखांची रोख व साडेचार कोटीचे दागिने आढळले होते.

नावेदकडे मोठी जबाबदारी

गेल्या पाच वर्षांत, दाऊद इब्राहिम याने ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून नेटवर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नावेदकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनंत जैनच्या मदतीने त्याने देशातील काही ठिकाणी आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली.

त्यानुसार ऑन-लाइन गेमिंग सॉफ्टवेअर, त्याच्या परदेशातील सर्व्हरसह, नावेदशी संबंधित सॉफ्टवेअर फर्मने विकसित केले आहे. या गुंतागुंतीच्या संरचनेमुळे तपास यंत्रणांसाठी सर्व्हरचा मागोवा घेणे आणि जबाबदार व्यक्तींना जबाबदार धरणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.

‘केजू’ला अटक केव्हा?

अनंत जैन याचा खरा कर्ताधर्ता नागपुरातील ‘केजू’असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या माध्यमातून अनंत जैन याने नागपुरातून ३० कोटी तर जबलपूर येथून ७० कोटी गोळा केल्याची माहिती आहे. असे असताना, त्याला ताब्यात घेतल्यास अनंत जैन याचे आणखी नवे प्रकरण समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे असतानाही ‘केजू’ अद्यापही मोकाट आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याचावर कुठलीही कारवाई झाल्या दिसून आलेले नाही. विशेष म्हणजे, त्याला ताब्यात न घेण्यासाठी काही मंडळींनीही फिल्डीग लावलेली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: अकोल्याचे जवान वैभव लहाने यांना वीरमरण; वीर जवानाच्या स्मृतीस जिल्ह्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!

Stock Market Today : चार दिवसांनंतर शेअर बाजार ‘हिरवा’ पण लगेचच ‘लाल’; कोल इंडियाचा IPO आजपासून खुला; कोणते शेअर्स घसरले?

धुरंधरला टक्कर देण्यासाठी सज्ज ‘द राजा साब’; प्रदर्शित होण्याआधीच झालेली कोट्यवधींची कमाई, आजचं कलेक्शन किती?

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरला आठ दिवसांआड पाणी हे सरकारचे पाप

CM Devendra Fadnavis : दोन महिन्यांत मिळणार शहराला रोज पाणी! मुख्यमंत्र्यांनी दिली नवी डेडलाइन

SCROLL FOR NEXT