nagpur sakal
नागपूर

Dhamma Chakra Pravartan Diwas : दीक्षाभूमीवर २२ प्रतिज्ञांचा जयघोष; काशाय वस्त्रात जपानच्या उपासकांना दिली दीक्षा

दीक्षाभूमीच्या प्रांगणात जपानचे उपासक-उपासिका डोक्यावरचे केस काढून उपस्थित झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात जपानहून आलेल्या उपासक उपासिकांनी आज श्रामणेरची दीक्षा घेतली. यावेळी त्यांनी काशाय वस्त्र म्हणजेच चिवर परिधान केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जपानच्या अनुयायांसह हजारो बांधवांना धम्मदीक्षा दिली. यावेळी २२ प्रतिज्ञांचा जयघोष करण्यात आला.

दीक्षाभूमीच्या प्रांगणात जपानचे उपासक-उपासिका डोक्यावरचे केस काढून उपस्थित झाले होते. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व उपासक रांगेनी हजर होते. त्यांच्या मागे जपानचे प्रतिनिधी बसले होते. उपासकांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यानंतर भदंत ससाईंचे आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर ससाई यांच्याकडून त्रिशरणसह दशशील ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.

यावेळी नागा बिकूनी, नागा पुरू, नागा दावई, नागा किर्रा, नागा सेवक, नागा चंद्रा, नागा सदक, नागा सॅम्युनेल, नागा बादल, नागा पवित्रा, नागा बालिश, नागा उत्कुलश, नागा इसामू, नागा चामकादल यांचा समावेश होता. मंचावर भदंत ससाई यांच्यासह भदंत धम्मसारथी, नागवंश, प्रज्ञा बोधी, भीमा बोधी, नागसेन, महानामा, राहुल, धम्मविजय, कश्यप, भदंत धम्मप्रकाश, संघप्रिया, विशाखा गौतमी, पुंडलिक उपस्थित होते. धम्म दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी १५ हजारांवर अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली. सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी जपान, थायलंड, मलेशिया आणि देश विदेशातील बौद्ध भिक्खू उपस्थित होते.

पँथर उद्‍गारचे प्रकाशन

धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवानिमित्त ‘पँथर उद्‍गार’ वार्षिकांकाचे प्रकाशन प्रसिद्ध हिंदी दलित साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांच्या हस्ते झाले. नागपूर विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले अध्यक्षस्थानी होते. दिल्लीचे शेखर पवार, डॉ रमेश शंभरकर, सिद्धार्थ मेश्राम प्रमुख पाहूणे होते. प्रकाश बनसोड, भाऊराव शेंडे, महेंद्र थूल, अरुण चुनारकर, प्रसेनजित ताकसांडे, गुलाब डोंगरे, भगवान रहाटे, हरीश माटे ,शेखर सोनारकर, रवींद्र पाटील, जय शंभरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

SCROLL FOR NEXT