Sitapur People sakal
नागपूर

Dhammachakra Pravartan Din : मुख्य प्रवाहात आणणारे ‘बाबासाहेब’च आमचे ‘देव’

बाबासाहेबांची लेखणी आमचे भले करण्यासाठी झिजली. शिवरायांची तलवार आमच्या हितासाठीच चालली होती. परंतु आम्ही भाकड कथा जोपासत राहिलो अन समस्यांच्या विळख्यात अडकलो.

सकाळ वृत्तसेवा

- अखिलेश गणवीर

नागपूर - बाबासाहेबांची लेखणी आमचे भले करण्यासाठी झिजली. शिवरायांची तलवार आमच्या हितासाठीच चालली होती. परंतु आम्ही भाकड कथा जोपासत राहिलो अन समस्यांच्या विळख्यात अडकलो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रकाश आमच्यासाठीही होता हे आम्हाला समजले, म्हणूनच आम्ही आमच्या खऱ्या वैचारिक ‘देवा’ला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर आलो.

परत जाताना येथून बाबासाहेबांची दोन पुस्तकं माझ्या मुलांसाठी घेऊन जाणार...हे शब्द आहेत, चर्मकार समाजात जन्मलेल्या सोनूश्री, राजराणी, जयराम, किरण यांचे. आम्ही उत्तर प्रदेशातील चर्मकार आहोत. चर्मकार समाजाला गौतम नावाने ओळखतात, मात्र गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचला नाही, हा विचार बाबासाहेबांच्या पुस्तकातून कळला असल्याचे किरण गौतम यांनी सांगितले.

चर्मकार जातीत जन्माला आलो याचा अभिमान आहे. सन्मानाने आनंदित जीवन जगत आहोत. हे जगण्याचे बळ आम्हाला बाबासाहेबांनी दिले आहे. या पावन भूमीला नमन करण्यासाठी लहान मुलांनाही घेऊ आलो, हेच आमचे प्रेरणास्थळ असल्याचे सांगताना सीतापूरच्या गावकऱ्यांचे मन भरून येत होते.

जातीअंतासाठी लढण्याचे बळ घेऊन जाणार

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील गावखेड्यातून जवळपास दीड हजार अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले. उत्तर प्रदेशातील विविध गावचे गाव दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या दीक्षा सोहळ्यासाठी आले आहेत. आम्ही चर्मकार, गौतम म्हणून ओळखल्या जातो. आमच्या परिसरात जातीभेद आजही पूर्णपणे मिटला नाही. म्हणूनच नागपुरात दीक्षाभूमीवर येऊन जातीअंतासाठी लढण्याचे बळ घेऊन जाणार आहोत. बाबासाहेबांचा संघर्ष मुलांना सांगून येणाऱ्या काळात आम्ही बौद्ध होऊ असेही संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT