नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी हे रेल्वे, बस तसेच खासगी वाहनाने दीक्षाभूमीला येतात. याकाळात परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी मास्टरप्लॅन तयार केला आहे.
विशेष म्हणजे, पंचशील चौकातील आणि विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पूल खचल्याने यादरम्यान कुठेही वाहतूककोंडी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमीजवळील आठ रस्ते २२ ऑक्टोबरच्या दुपारी ३ वाजतापासून ते २५ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजतापर्यंत बंद राहणार आहेत.
पार्किंगची ठिकाणे
धरमपेठ सायन्स कॉलेज, धरमपेठ आर्ट ॲन्ड कॉमर्स स्कूल, धरमपेठ शाळा, राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर, बजाजनगर बास्केट बॉल मैदान, मॉडर्न हायस्कूल नीरी, पटवर्धन मैदान, नवीन डी. पी. रोड, कृपलानी चौक ते अजनी रेल्वे पूल चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या मार्गावर.
ड्रॅगन पॅलेससाठी बंद केलेले मार्ग
पोरवाल कॉलेज रोड, वाय पॉइंट, ते भोयर कॉलेज टी पॉइंट
पर्यायी मार्ग
कुंभारे कॉलनी, आझादनगर, लुम्बिनी नगर, छत्रपतीनगर या भागातील रहिवासी व मार्गावरील इतर वाहतूक ही रमानगर रेल्वे क्रॉसिंगचे निर्माण काम सुरू असल्याने वाहतुकीस बंद केली आहे.
ही वाहतूक भुयारी पुलीया, जे. एन रोडने पुढे अजनी रेल्वे क्रॉसिंग, अजनी गाव नीरी पुलानंतर उजवे वळण हैदराबाद हायवे, लिहीगाव पुलाच्या खालून उजवे वळण घोरपड रोड, घोरपड टी पॉइंट, उजवे वळण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उजवे वळण घेऊन छत्रपती नगर, रविदासनगर, कुंभारे कॉलनी आझादनगर या मार्गाचे वापर ये-जा करण्यासाठी करता येईल.
बंद असलेले मार्ग (२२ ते २५ ऑक्टो.)
काचीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वसतिगृह) ते माताकचेरी चौकापर्यंतचा दोन्ही बाजूचा मार्ग
काचीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वसतिगृह ) ते कल्पना बिल्डिंग (रामदासपेठ) टी पॉइंट पर्यतचा दोन्ही बाजूचा मार्ग
माताकचेरी चौक ते वर्धा मार्गावरील कृपलानी टर्निंग, वर्धा रोड पर्यतचा दोन्ही बाजूचा मार्ग
माताकचेरी चौक ते नीरी रोड टी पॉइंट (फुड झोन मधील लहान मालवाहक वाहनांना सोडून)
माताकचेरी चौक ते लक्ष्मीनगर चौकापर्यंतचा दोन्ही बाजूचा मार्ग
काचीपुरा चौक ते बजाजनगर चौकापर्यंत दोन्ही बाजूचा मार्ग
बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारा मार्ग
अजनी रेल्वेपूल ते कृपलानी चौक पर्यतचा उजव्या बाजूचा मार्ग आणि दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयांनांना पार्किंग करिता वापरता येणार आहे. फुड पाकिट/जेवण वाटप करणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
वळविण्यात आलेले मार्ग
जनता चौकाकडून काचीपुरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही जनता चौक - पंचशील चौक (उजवे वळण) - मेहाडिया चौक- मुंजे चौक(डावे वळण)- झासी राणी चौक - लायब्ररी चौक- अलंकार चौक या मार्गाने जाईल.
वर्धा मार्गाकडून कृपलानी टर्निंगच्या मार्गे माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही वर्धा रोड वरून अजनी चौक पूल, अजनी चौक येथे डावे वळण घेऊन आरपीटीएस मार्गाने जाईल. , जनता चौकाकडून कृपलानी टर्निंग मार्गे माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक वर्धा रोड वरून अजनी पूल चौकातून उजवे वळण घेऊन आरपीटीएस मार्गाने जाईल., अलंकार टॉकिज चौकाकडून काचीपूरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही नॉर्थ अंबाझरी मार्गावरून शंकरनगर चौक व विद्यापीठ लायब्ररी चौक - झासी राणी चौक - मुंजे चौक या मार्गाने जाईल., लक्ष्मीनगर चौकाकडून माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही बजाजनगर चौकाकडे व आठ रस्ता चौक मार्गाने जाईल.
नीरी टी पॉइण्ट ते माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही आरपीटीएस व अजनी चौक मार्गाने जाईल., बजाजनगर चौकाकडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक व्हीएनआयटीचौक, अभ्यंकरनगर मार्गाने जाईल., अजनी रेल्वे पुलावरून येणारी वाहतूक ही उजवीकडे अजनी रेल्वे स्टेशन मार्गाने किंवा डावीकडे चुनाभट्टी मार्गाने पुढे जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.