Diabetes esakal
नागपूर

Diabetes : ४० टक्के मधुमेहींना करावा लागतो, लैंगिक अडचणींचा सामना

Diabetes : दर पाच गर्भवतींमध्ये एक माता मधुमेही होते. हे प्रमाण चिंताजनक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Diabetes : चिमुकले बाळ येण्याची चाहूल लागते, ती साऱ्या कुटुंबासाठी गोड बातमी असते. घरातील वातावरण आनंदी असते. अचानक गर्भवती माता गोड आजाराच्या (मधुमेह) विळख्यात सापडल्याचे निदानातून पुढे येते. बदलत्या जीवनशैलीतून गर्भवती मातेला मिळालेली ही जणू देणगीच. दर पाच गर्भवतींमध्ये एक माता मधुमेही होते. हे प्रमाण चिंताजनक आहे.

तसेच ४० ते ५० टक्के मधुमेही दाम्पत्यांना लैंगिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी लग्नानंतर ‘नव्या पाहुणा’ घरात आणण्याची तयारी करताना महिलांनी मधुमेहाची चाचणी करून निदान करावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा पदरात विकृत बाळ येण्याची जोखीम असते, असा इशारा मधुमेही तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी दिला.

नागपुरात मधुमेह विषयावर ७ ते ९ जून या कालावधीत येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे १० व्या हॅलो डायबेटिज शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मधुमेही दाम्पत्यांना लैंगिकतेचा सामना करावा लागतो, हे स्पष्ट आहे.

मधुमेहामुळे मानसिक संतुलन बिघडते. याशिवाय वंध्यत्वाचीही मोठी जोखीम असल्याचे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता उपस्थित होत्या.

गर्भवती मातेला पूर्वीपासूनच मधुमेह असल्यास मोठा धोका आहे. मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक औषध घेतल्यास त्याचा गर्भातील बाळावर विपरीत परिणाम होतो. बाळाची वाढ खुंटू शकते. बाळ विकृत होण्याची भीती असते. अचानक गर्भपाताची भीती असते. प्रसूतीपूर्वीचा मधुमेह चिंताजनक आहे.

- डॉ. सुनील गुप्ता, मधुमेही तज्ज्ञ, नागपूर

शनिवारी उद्‌घाटन

विविध संस्थांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘हॅलो डायबेटिक’ परिषदेत शुक्रवार (ता.७) कार्यशाळांचे आयोजन केले आहे. डायबेटिक फूट, लैंगिक संबंध, कृत्रिम बुद्धिमत्ता, पोषणहार आणि तांडव या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येतील. याशिवाय डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह पाच पदमश्री डॉक्टरांचा सत्कार करण्यात येईल.

शनिवारी (ता.८) दुपारी १२.४५ वाजता माजी राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. तीन दिवसांच्या परिषदेत १३५ व्याख्यान, ७० शोधनिबंध सादर करण्यात येतील. यासाठी ५४ सत्र घेण्यात येतील. संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत सोहळा होणार असून, या कार्यक्रमाला देश-विदेशातील मधुमेही तज्ज्ञ उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

SCROLL FOR NEXT