file photo
file photo 
नागपूर

निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद ! एकाचा दुसऱ्याला निधी देण्यास स्पष्ट नकार

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये ऑलबेल नाही. निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याला विकास निधीचा एकही रुपया देणार नसल्याच चक्‍क समोरच म्हटलं.

जिल्हा परिषदेत सहा पदाधिकारी असून त्याच्यात १० विभागांचा कारभार आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य विभागांतर्गत विविध बांधकाम व इतर कामासाठी निधी मिळतो. हा निधी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत इतर पदाधिकारी आणि सदस्यांना देण्यात येते. जिल्हा परिषदत्या सेस फंडमध्ये निधी नसला तरी शासनाकडून काही विभागांना निधी मिळाला आहे.

हा निधी मिळण्यासाठी पदाधिकारी, सदस्य प्रयत्नशील आहेत. निधी मिळण्याची मागणी एक पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. विभागाचे पदाधिकारी निधी मागणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी त्यांच्या कक्षात काही अधिकारी चर्चा करीत होते. कक्षात जातात पदाधिकाऱ्यांनी त्यांना विभागाचा एकही रुपया देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. जास्त काही न बोलता त्यांनी कक्षातून जाण्याचा सल्ला दिला. यामुळे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले. 

त्यांनी आपली नाराजी काहीकडे बोलून दाखविली. आपण निधी न दिल्यात ते ही निधी देणार नाहीत. यामुळे आपल्यालेही नुकसान होणार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नंतर निधी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. जिल्हा परिषदेत हा विषय चांगलाच चर्चेला रंगला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT