नागपूर

काँग्रेसमध्ये वाद; बैठकीत वंजारी-हजारे समर्थक भिडले

राजेश चरपे

नागपूर : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. रविवारी आमदार तसेच नवनियुक्त प्रदेश महासचिव अभिजित वंजारी यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाषण सुरू असतानाच पुरुषोत्तम हजारे यांनी वंजारी यांच्यासमोरील माइक फेकला तर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घालून सभा उधळून लावली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीअंतर्गत रविवारी रात्री पारडी येथे लॉनमध्ये ब्लॉक क्रमांक दोनच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ब्लॉक अध्यक्ष युवराज वैद्य यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीत अभिजित वंजारी यांचे भाषण सुरू असतानाच पुरुषोत्तम हजारे समर्थकांसह तेथे दाखल झाले. आम्हाला बैठकीला का बोलावण्यात आले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नंतर हजारे समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माइक फेकला, टेबल व खुर्च्या फेकल्या. त्यामुळे बैठकच गुंडाळावी लागली. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत हजारे काँग्रेसचे उमेदवार होते. ते नगरसेवकसुद्धा आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते कट्टर समर्थक आहेत.

आपणास व आपल्या समर्थकांना मुद्दामच बैठकीला बोलावले नव्हते. ज्या ठिकाणी बैठक घेण्यात आली जवळच आपले घर आहे. याच परिसराचा मी नगरसेवक आहो. काँग्रेसच्या बैठकीचे निमंत्रण नाकारून आपला अपमान करण्यात आला. हा विषय पक्षाच्या मंचावर नेण्यात येईल, असे पुरुषोत्तम हजारे यांचे म्हणणे आहे. बैठकीचे आयोजक युवराज वैद्य यांनी हजारे संघटनेचे पदाधिकारी नसल्याने त्यांना बोलावले नव्हते असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT