Private bus travel ticket rate hike 
नागपूर

Diwali Festival : नागपूर-पुणेसाठी मोजा चार हजार

खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लुट : आरटीओचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवाळीत गर्दीमुळे मनमानी भाडे आकारून खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची लुट चालविली आहे. सुमारे हजार रुपये असलेले पुण्याचे भाडे साडेचार हजार रुपयांवक गेले आहे. रेल्वेचे वेटिंग आणि एसटीची गर्दी पाहून प्रवासी ट्रॅव्हल्सकडे नाइलाजाने धाव घेत आहेत. या लुटमारीकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवाशांकडून होऊ लागला आहे.

एसटीच्या ५० टक्के अधिक भाडे वसूल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालक आधीपासूनच हे भाडे वसूल करीत आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात मनमानी भाडे आकारून ते प्रवाशांना लुटत आहेत.

रक्षाबंधन, दसरा नंतर भाऊबीजपर्यंत भाडेवाढ कायम राहणार असल्याचे खासगी बस चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे सुमारे हजार रुपये असलेले नागपूर-पुणे ट्रव्हल्सचे भाडे चारहजारावर आकारले जात आहे.

दिवाळीसाठी नोकरदार वर्ग, विद्यार्थी मुळगावी जातात. याची संख्या नागपूर, पुण्यात जास्त आहे. अशावेळी ट्रॅव्हल्स चालक सणासुदीचा गैरफायदा घेत आहेत. जे ग्राहक उत्पन्नाचे साधन आहेत त्यांचीच अडचणीच्या काळात लुटमार सुरू आहे. या घृणास्पद प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आरटीओचे लक्ष कुठे आहे?

मनमानी भाडे आकारणीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)कडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नाशिक येथे झालेल्या खासगी बसच्या अपघातानंतर नागपूरमध्ये केवळ देखावा म्हणून थातुरमातूर कारवाई करण्यात आली.

अग्निशमन यंत्रणा नसणे, बसचा आपत्कालीन दरवाजा न उघडणे अशा समस्या असतानाही नागपुरात बिनधास्त ट्रॅव्हल्स धावत आहेत. अशा गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट कसे मिळते? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या मार्गावर जास्त गर्दी

पुणे सोबतच औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, शेगाव, अकोला, जालना, हैदराबाद, अलाहाबाद, सारणी, इंदूर, भोपाळ, रायपूर, जबलपूरला जाण्यासाठी गर्दी होत आहे. गणेशपेठ, बैद्यनाथ चौक, सीए रोड, धंतोली, छत्रपती चौक, एमपी बस स्टँड येथे बुकिंग कार्यालयासमोर खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसत आहे. याकरिता सामान्य दिवशी ५०० ते १२०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत असलेले भाडे दिवाळीत २५०० ते ४५०० पर्यंत आकारले जात आहे.

सामान्य प्रवासी जुनेच दर समजून खासगीकडे जात आहेत. मात्र, त्यांच्याकडून तीनपट भाडे आकारले जात आहे. ही लुट थांबविण्यासाठी खासगी बसच्या भाडेवाडीवर अंकुश लावण्याची गरज आहे. मात्र, कारवाई होताना दिसत नसल्याने खासगी बसचालकांची मुजोरी वाढली आहे.

- बसंत कुमार शुक्ला,सचिव- भारतीय यात्री केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT